
रत्नागिरी : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, भारतीय रेल्वेने तिरुवनंतपुरम सेंट्रल ते हजरत निजामुद्दीन मार्गावर एक विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. आज, शनिवारी ही एक दिशा विशेष गाडी तिरुअनंतपुरम येथून सुटली असून रविवारी, १८ मे सकाळी ६ वाजता ती रत्नागिरी स्थानकावर येणार आहे.

मुंबई : पहलगाम येथे २६ निरपधराध भारतीयांच्या हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर द्वारे मोदी सरकारने चोख उत्तर दिले. पहलगाम हल्ल्यात ज्यांचे कुंकू पुसले गेले अशा ...
गाडी क्रमांक ०६०३३, तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन एकमार्गी विशेष रेल्वे
ही विशेष रेल्वे शनिवार, १७ मे २०२५ रोजी तिरुवनंतपुरम सेंट्रल येथून सकाळी ०७:३० वाजता सुटली. ती तिसऱ्या दिवशी दुपारी २. ०० वाजता हजरत निजामुद्दीन येथे पोहोचेल. या गाडीला कोकणात मडगावनंतर रत्नागिरी, रोहा, पनवेल आणि वसई रोड येथे थांबे असतील. रविवारी सकाळी सहा वाजता ही गाडी रत्नागिरी स्थानकातून दिल्लीकडे रवाना होईल. गाडीमध्ये एकूण २४ डब्बे असतील. त्यामध्ये ११ सामान्य डबे, १० शयनयान (स्लीपर), २ वातानुकूलित ३-Tier डबे आणि १ एसएलआर डबा असेल. प्रवाशांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.