
पाऊस बिघडवणार केकेआरचा खेळ
या सामन्याच्या आधीपासूनच पावसाची शक्यता होती. बंगळुरूमध्ये पावसाची ७० टक्के शक्यता वर्तवण्यात आली होती. चिन्नास्वामी स्टेडियमचे ड्रेनेज सिस्टीम चांगली आहे आणि पाऊस थांबल्यानंतर येथे काही वेळात खेळ सुरू होऊ शकतो. मात्र हवामानाबाबत काहीच सांगता येत नाही.
🚨 Update 🚨
The toss has been delayed due to rain. Stay tuned for further updates.#TATAIPL | #RCBvKKR pic.twitter.com/AQzBqFNV6M
— IndianPremierLeague (@IPL) May 17, 2025
पावसामुळे आरसीबी आणि केकेआर यांच्यातील सामना धुतला गेला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. अशातच आरसीबीचे १७ गुण होतील आणि ते प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के करतील. दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल २०२५च्या प्लेऑफमधून बाहेर जातील. सामना धुतल्यास केकेआरचे १२ गुण होतील आणि शेवटा सामना जिंकल्यास त्यांचे जास्तीत जास्त १४ गुण होतील.