Saturday, May 17, 2025

क्रीडाIPL 2025महत्वाची बातमी

RCB vs KKR: पावसाचा व्यत्यय कायम, केकेआर प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर, आरसीबी अव्वल

RCB vs KKR: पावसाचा व्यत्यय कायम, केकेआर प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर, आरसीबी अव्वल
बंगळुरू: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. यामुळे गतविजेत्या कोलकाताचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. दरम्यान, केकेआर १२ अंकांसह सहाव्या स्थानावर आहे. मात्र प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा संपल्या आहे. तर १७ गुणांसह आरसीबी पहिल्या स्थानावर आहे. म्हणजेच आरसीबीचा संघ प्लेऑफमध्ये कन्फर्म झाला आहे. आरसीबीचे आणखी २ सामने शिल्लक आहेत.

आयपीएलच्या दुसऱ्या भागातील पहिल्याच सामन्यात पावसाचाच खेळ रंगला. मोठ्या संख्येने हा सामना पाहण्यासाठी चाहते आले होते. कोहलीने कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर त्याची ही पहिलीच संधी होती. त्याला चीअर करण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते सफेद रंगाची जर्सी घालून मैदानात आले होते. मात्र पावसामुळे टॉसही झाला नाही.

आरसीबी अव्वल


आयपीएल २०२५च्या गुणतालिकेत सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ अव्वल आहे. आरसीबीचे १२ सामन्यांमपैकी ८ सामन्यांतील विजयासह १७ गुण आहेत. या सामन्यात विजयानंतर प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले आहे.
Comments
Add Comment