
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी स्टेडियम क्वालिफायर २ आणि अंतिम सामन्यासाठी निवडले आहे. हे दोन्ही सामने अनुक्रमे एक आणि तीन जून रोजी होणार आहेत. यामुळे वादाला तोंड फुटले आहे. कोलकाताचे क्रिकेटप्रेमी अंतिम सामना ईडन गार्डन स्टेडियम येथेच व्हावा यासाठी आग्रही आहेत आणि आंदोलन करत आहेत. बीसीसीआयने अद्याप दोन्ही क्वालिफायर मॅच (पात्रता फेरीचे सामने), एलिमिनेटर (बाद फेरीचा सामना) आणि अंतिम सामना कुठे खेळवणार हे जाहीर केलेले नाही. पण आधीच सामन्यांच्या ठिकाणांवरुन वादाला तोंड फुटले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाला सुरुवात झाली आणि पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना अर्धवट स्थितीत थांबवण्यात आला. आता हा सामना नव्याने २४ मे रोजी खेळवला जाणार आहे. आधी धरमशाला येथे ८ मे रोजी झालेला सामना अर्धवट स्थितीत थांबवण्यात आला होता. आता २४ मे रोजी हा सामना जयपूर येथे होणार आहे.