
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला मोठा झटका; असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश
पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. पुणे जिल्ह्यातील कात्रज विकास आघाडी देखील फुटली आहे. कात्रज विकास आघाडीचे संस्थापक नमेश बाबर, अध्यक्ष स्वराज बाबर आणि त्यांचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
ठाण्यातील महापौर निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पुण्यातील कात्रज विकास आघाडीचे अध्यक्ष नमेश बाबर यांच्यासह काही सरपंचांनी तसेच राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.

विशिष्ट परिस्थितीत वेग मर्यादा किंचित वाढल्यास दंड वसुलीत शिथिलता देण्याची महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसची मागणी मुंबई : मुंबई पुणे द्रुतगती ...
कात्रज विकास आघाडीचे संस्थापक नमेश बाबर, अध्यक्ष स्वराज बाबर आणि अनिल कोंढरे, गणेश मोहिते, सिद्धार्थ वंशी, तानाजी दांगट, निलेश धनावडे, नितीन कोमन, गणपततात्या गुजर, भालचंद्र पवार आणि उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे आणि ग्रीक रोमन महाराष्ट्र केसरी संग्राम बाबर यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी धनुष्य बाण हातात घेतला आहे.