
हवामान विभागाने मुंबई महानगर प्रदेशात (Mumbai Metropolitan Region or MMR) शनिवारी हलक्या सरींची शक्यता वर्तवली होती. तसेच काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला होता. पुढील पाच दिवस राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता.
मुंबईत शुक्रवारी ३४.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उकाड्याने नागरिक त्रस्त झाले होते. पण शनिवारी सकाळीच पावसाचे आगमन झाले आणि पारा घसरला.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई महानगर प्रदेशात अनेक ठिकाणी दिवसभर ढगाळ वातावरण राहील. संध्याकाळी किंवा रात्री निवडक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्यची शक्यता आहे. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना यामुळे थोडा दिलासा मिळेल.