
मुंबई(ज्ञानेश सावंत): दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर आयपीएल २०२५ चे सामने आजपासून सुरू होत आहेत. आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु रायडर्स यांच्यात रंगणार आहे. कोलकाता पात्रता फेरीतून बाहेर गेल्यामुळे त्यांच्यासाठी विजय किंवा पराभव हे जास्त गरजेचे नसले तरीही रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूसाठी पात्रता फेरीत अव्वल स्थान मिळविण्यासाठी आजचा विजय महत्त्वाचे असेल, बंगळूरुचा संघ कोलकातासमोर नक्कीच वरचढ ठरणार आहे, त्यांची फलंदाजी ही उत्तम असून ते नेहमीच आव्हानात्मक धावसंख्या उभारण्याचे प्रयत्न करीत आहेत.
आजही त्यांचा प्रयत्न हाच असेल की २००-२२५ धावसंख्या उभारून समोरच्या संघावर दबाव निर्माण करायचा. स्वतः विराट कोहली, कर्णधार पाटीदार, मयंक अग्रवाल सारखे धडाकेबाज फलंदाज आहेत, तर गोलंदाजीमध्ये जोश हॅझलवूड, भुवनेश्वर कुमार, कृणाल पंड्या आहेत. आजच्या सामन्यात जोश हॅझलवूड खेळणार की नाही, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. कोलकाताचा संघ ही त्याच ताकदीचा आहे, त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला हा सामना सहजासहजी जिंकता येणार नाही.
अजिंक्य राहणे, सुनील नारायण, व्यंकटेश अय्यरसारखे फलंदाज तर वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्तीसारखे गोलंदाज आहेत. पहिल्या फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने कोलकाताचा ७ गडीनी पराभव केला होता. त्यामुळे बंगळूरुचे पारडे नक्कीच जड आहे. २०-२० मध्ये कधीही काहीही होऊ शकते, अगदी शेवटच्या षटकात निर्णय बदलू शकतो. चला तर बघूया आयपीएलच्या शेवटच्या टप्प्यात काय होणार आहे.