
एसी लोकलचे तिकीट एकतर सर्वसामान्य लोकलपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. त्यात जर रेल्वेचे कर्मचारी असल्याचे सांगून असा विनातिकीट प्रवास होत असेल तर नियम फक्त सर्वसामान्य नागरिकांनाच आहेत का? असा सवाल रेल्वे प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दादर अंबरनाथ एसी लोकलमध्ये नुकतीच घडली आहे. या लोकलमध्ये प्रवाशांचे तिकीट तपासण्यासाठी ४ टीसी चढले. प्रवाशांनी तिकीट दाखवण्यास सुरुवात केली. पण सीटवर बसून आरामात प्रवास करणाऱ्या चार ते पाच जणांनी स्टाफ असल्याचे सांगताच तिथे उपस्थित असलेल्या टीसीने त्यांच्याजवळील तिकीट किंवा पास तपासला नाही. विशेष म्हणजे त्यापैकी एकाच्या खिशात एनआरएमयूचे कार्ड होते. हे पाहून तिथे उपस्थित एका प्रवाशाने या प्रवाशांचे तिकीट का तपासले नाहीत? असा जाब टीसीला विचारला. तर टीसीने या प्रवाशांचे तिकीट तपासण्याचे सोडून प्रवाशालाच उलट
उत्तर दिले.