
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज महल पॅलेस हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई मेलद्वारे देण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर तीन - चार दिवसांत बॉम्बस्फोट होणार अशी धमकी ई मेलद्वारे देण्यात आली आहे. हा धमकीचा ई मेल मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाला प्राप्त झाला. पाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज महल पॅलेस हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई मेल मुंबई पोलिसांना प्राप्त झाला आहे.
सायबर पोलीस दोन्ही ई मेल प्रकरणी तपास करत आहेत. अद्याप कुठेही स्फोट झालेला नाही. पोलिसांनी दोन्ही ई मेलचा सेंडर शोधण्याचे प्रयतन सुरू केले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी गस्तीत वाढ केली आहे. तसेच महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी बंदबस्त वाढवला आहे.