Thursday, August 14, 2025

Chitra Wagh : भाजपा महिला मोर्चा तर्फे राज्यभर 'सिंदूर यात्रा'

Chitra Wagh : भाजपा महिला मोर्चा तर्फे राज्यभर 'सिंदूर यात्रा'
मुंबई : पहलगाम येथे २६ निरपधराध भारतीयांच्या हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर द्वारे मोदी सरकारने चोख उत्तर दिले. पहलगाम हल्ल्यात ज्यांचे कुंकू पुसले गेले अशा आपल्या भगिनींच्या अश्रूचा भारतीय सैन्याने बदला घेतला. भारतीय सैन्य दलाच्या जवानांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रदेश महिला मोर्चातर्फे राज्यभर सिंदूर यात्रांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आ. चित्रा वाघ यांनी शनिवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत आ. चित्रा वाघ बोलत होत्या. प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष वर्षा भोसले आदी यावेळी उपस्थित होते. आपण २१ मे रोजी नांदेड येथे काढण्यात येणाऱ्या सिंदूर यात्रेत सहभागी होणार आहोत, अशी माहितीही आ. चित्रा वाघ यांनी दिली.

दहशतवाद्यांच्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी केलेल्या कारवाईत मिळालेले यश भारतीय स्त्री शक्तीला समर्पित केल्याबद्दल आणि या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे नाव दिल्याबद्दल समस्त महिला शक्तीतर्फे आ. चित्रा वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. आ. चित्रा वाघ यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला जबरदस्त उत्तर देत भारतीय लष्कराने नवभारताची प्रचिती आणून दिली आहे. या मोहिमेत भारतीय सैन्याने अतुलनीय शौर्य दाखविले. सैन्य दलाच्या पराक्रमाला, अढळ निश्चयाला अभिवादन करण्यासाठी भाजपा महिला मोर्चातर्फे देशभर सिंदूर यात्रांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातही अशा यात्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ही सिंदूर यात्रा निघणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.


लेखकाचे नाव गटारातला अर्क असे हवे


भारतीय लष्कराच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी देशभर तिरंगा यात्रा काढल्या जात आहेत. या यात्रांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या यात्रांमध्ये सर्व थरातील नागरिक पक्ष भेद बाजूला ठेवून सहभागी होत आहेत. सिंदूर यात्रांमध्येही महिलांनी याच पद्धतीने सहभागी व्हावे असे आवाहनही आ. चित्रा वाघ यांनी केले. लेखकाचे नाव गटारातला अर्क असे हवे खा. संजय राऊत यांनी आपल्या नरकातला स्वर्ग या पुस्तकात पत्रा चाळीच्या प्रकरणात फसविल्या गेलेल्या सामान्य नागरिकांचे मनोगतही समाविष्ट करावे, असा टोला आ. चित्रा वाघ यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात लगावला.

खा. राऊत हे दररोज सकाळी जी भाषा वापरतात ते पाहता त्यांचे नाव गटारातला अर्क असे हवे, असेही त्या म्हणाल्या. पत्रा चाळीच्या भाडेकरूंची घरे घेऊन त्यांना फसवले गेले, अनेक महिलांनी आपली मंगळसूत्रे गहाण ठेवून घर घेण्यासाठी पैसे उभे केले होते. या महिलांचा आकांत महाराष्ट्राने पाहिला आहे. त्याबद्दलही या पुस्तकात एखादे दुसरे प्रकरण हवे, असे आ. वाघ म्हणाल्या.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >