
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीसह अनेक सेलिब्रिटी महाराजांचे भक्त
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली व्यतिरिक्त, इतर अनेक स्टार्सही प्रेमानंद महाराजांचे भक्त असून दर्शनासाठी जातात. यामध्ये अभिनेता आशुतोष राणाही प्रेमानंद महाराजांना भेटण्यासाठी गेले होते. ‘छावा’ चित्रपटाच्या यशानंतर या अभिनेत्याने त्यांच्या आश्रमाला भेट दिली होती. या अभिनेत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात तो महाराजांशी बोलताना दिसला.

पाण्यावरून तापलं राजकारण! सिंधु जल करारावरून उमर अब्दुल्ला – मेहबूबा मुफ्ती यांच्यात ट्विटर युद्ध, आरोपांच्या फैरी!
महबूबा मुफ्तींच्या 'शांतीवादा'वर उमर अब्दुल्लांचा सणसणीत प्रहार! श्रीनगर : जम्मू-कश्मीरमध्ये राजकीय तापमान पुन्हा एकदा वाढले आहे. सिंधु जल करारावरून ...
हेमा मालिनी ते द ग्रेट खलीनेही घेतलं आहे महाराजांचे दर्शन
ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी देखील वृंदावन येथील आश्रमाला भेट देतात.नुकतीच त्यांनीही महाराजांचे आशीर्वाद घ्यायला त्यांच्या आश्रमाला भेट दिली. त्यांनी प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेतले. अभिनेते आणि नेते रवी किशन यांनीही प्रेमानंद महाराजांची भेट घेतली होती. त्यांनी देखील त्यांचे मार्गदर्शन घेतले होते. त्यानंतर कुस्तीगीर द ग्रेट खली वृंदावनात येऊन गेले आहेत. यावेळी त्यांनी प्रेमानंद महाराजांची भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या समस्या महाराजांसोबत शेअरही केल्या आणि खाजगी संभाषणांमध्ये भाग घेतला.