Saturday, May 17, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

पाकिस्तानला मदत करणाऱ्या १३ जणांना अटक, अटकेत असलेल्यांमध्ये सहा यू ट्युबर आणि सात ओटीपी घोटाळेबाज

पाकिस्तानला मदत करणाऱ्या १३ जणांना अटक, अटकेत असलेल्यांमध्ये सहा यू ट्युबर आणि सात ओटीपी घोटाळेबाज

नवी दिल्ली : पाकिस्तानला मदत करणाऱ्या तेरा जणांना देशाच्या विविध भागांतून अटक करण्यात आली आहे. यात सहा यू ट्युबर आणि सात ओटीपी घोटाळेबाज यांचा समावेश आहे. अटक केलेले यू ट्युबर पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होते. यात ट्रॅव्हल व्लॉगर ज्योती आणि गुजाला, यामीन मोहम्मद, देविंदर सिंग ढिल्लन, अरमान यांचा समावेश आहे. यू ट्युब व्हिडीओ तयार करण्याच्या निमित्ताने फिरताना देशातले सहा यू ट्युबर पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होते. या प्रकरणात ज्योतीला अधिकृत गुप्तता कायदा आणि भारत न्याय संहिता कलम १५२ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. इतर यू ट्युबरनाही हेरगिरी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तर आसाम पोलिसांनी ओटीपी शेअर करून पाकिस्तानातील लोकांना भारतीय नंबरवरून व्हॉट्सअॅप वापरण्यास मदत करणाऱ्या ७ जणांना अटक केली.





गजराज मिलिटरी इंटेलिजेंसकडून माहिती मिळाली की त्यांना असे अनेक लोक सापडले आहेत जे भारतीय व्हॉट्सअॅप नंबर वापरून अकाउंट तयार करण्यासाठी पाकिस्तानातील लोकांना ओटीपी पाठवत होते... गेल्या अनेक दिवसांपासून तांत्रिक विश्लेषण केले जात होते आणि १४ तारखेला एसटीएफमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर ऑपरेशन घोस्ट सिम सुरू करण्यात आले. कारवाईचा एक भाग म्हणून, राजस्थानातील हैदराबाद येथे पथके पाठवण्यात आली... आणि १६ तारखेच्या दुपारपासून सात जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेले सर्वजण ओटीपी शेअर करत होते. यातून एक देशासाठी धोकादायक असा गुन्हा घडत होता; असे पोलिसांनी सांगितले. पाकिस्तानी देशविरोधी कारवायांसाठी जे व्हॉट्सअॅप अकाउंट वापरत होते ते भारतीय आहे, असा भारतीय तपास पथकांचा समज होत होता. यामुळे पाकिस्तानींना देशविरोधी कारवाया करुनही प्रदीर्घ काळ सुरक्षित राहणे आणि स्वतःची खरी ओळख लपवणे शक्य झाल्याचे पोलिसांनी सांगितले.




Comments
Add Comment