विरारकरांचा प्रवास होणार गतिमान

  14

वसईत होणार डबल डेकर पुलाची उभारणी


मुंबई:  मुंबई उपनगरातील सर्वात व्यस्त रेल्वे मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम रेल्वे मार्ग म्हणून ओळखला जातो. दरम्यान वसई-विरारला सध्या दोनच मार्ग आहेत. येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी तर दुसऱ्या बाजूला रेल्वेवर प्रवास करताना लोकलमध्ये प्रवाशांना कराव्या लागणाऱ्या कसरतीमुळे नायगाव-भाईंदर दरम्यानच्या खाडीवर नवा पूल उभारण्याची मागणी सातत्याने होत होती. यानुसार आता महाराष्ट्र शासन आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्या संयुक्त विद्यमाने वसई खाडीवर प्रथमच रोड आणि रेल्वे वाहतुकीसाठी डबल डेकर पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


या प्रकल्पामुळे मुंबईपासून विरारपर्यंतचा प्रवास अधिक सुलभ, वेगवान व सुसंगत होणार आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही बहुउद्देशीय योजना उत्तन विरार सागरी सेतू (यूव्हीएसएल) व मिरा रोड-विरार मेट्रो लाइन १३ या दोन मोठ्या प्रकल्पांना एकत्र आणून पूर्ण केली जाणार आहे. वसई खाडीवर सुमारे पाच कि.मी. लांबीचा हा डबल डेकर पूल उभारण्यात येणार असून, या पुलाच्या वरच्या भागावर मेट्रो मार्ग तर खालच्या स्तरावर आठ लेनचा महामार्ग असणार आहे. डबल डेकर असलेल्या या पुलामुळे केवळ प्रवासच नव्हे, तर औद्योगिक व आर्थिक विकासालाही चालना मिळेल.


उत्तर मुंबई महानगर क्षेत्रातील विकासासाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे. शिवाय, हा पूल दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेशी थेट जोडला जाणार असल्यामुळे लॉजिस्टिक नेटवर्क अधिक मजबूत होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुढाकाराने या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे.. मुंबई- पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रचंड गर्दी आणि वेळखाऊ प्रवास या समस्यांवर हा प्रकल्प प्रभावी उत्तर ठरणार आहे. या दोन्ही प्रकल्पांची एकत्रित अंदाजे किंमत ९४ हजार कोटी आहे. जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (जेआयसीए) या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून निधीची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. यामुळे प्रकल्पाच्या आर्थिक बाजूला भक्कम आधार मिळणार आहे.


महत्त्वाची वैशिष्ट्ये : एकूण लांबी : ४.९८ कि.मी. रुंदी: ३०.६० मीटर वरील स्तर मेट्रो मार्ग (लाइन १३) खालपा सार आठ लेन महामार्ग मुख्य निधीपुरवठा : णेआयसीए कार्यान्वयन संस्था एमएमआरडीए

Comments
Add Comment

उद्धव ठाकरे आणि आव्हाडांच्या भूमिकेवर भाजपचा सवाल

हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल

Housing Jihad: धक्कादायक! हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर संजय निरुपम यांचा घणाघात मुंबई: पश्चिम

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी: मंत्री मंगलप्रभात लोढा

जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईत ५१ कबुतरखाने बंद... पक्ष्यांना खायला घालण्यास पूर्णपणे बंदी! आतापर्यंत १०० जणांहून अधिक लोकांना ठोठावला दंड

मुंबई: कबुतरांना खायला देण्यावरील बंदी लागू झाल्यापासून, बीएमसीने दादर कबुतरखान्यात १०० हून अधिक लोकांना दंड