जामखेड-सौताडा महामार्गाला विरोधाचे ग्रहण ?

  17

जामखेडकरांचा यंदाचा पावसाळाही चिखलात


जामखेड : शहरातून जाणाऱ्या जामखेड सौताडा महामार्गाचे काम सुमारे तीन वर्षपासून अत्यंत संथ गतीने सुरु असून या महामार्गाला ''विरोधाचे ग्रहण'' लागले असून राज्याचे प्रश्न सोडवणाऱ्या पुढार्यांना मात्र या महामार्गाचा प्रश्न तीन वर्षांपासून सोडवता आला नसल्याने जामखेडकरांना यंदाचाही पावसाळा चिखल तुडवत जाणार असल्याचे चित्र निर्माण झाले असून काही ठराविक अतिक्रमचा विषय असताना संपूर्ण जामखेडकरांना वेठीस धरण्याचा प्रकार होत असून दोन बायका आणि फजिती ऐका अशी अवस्था झाली असून याबाबत स्थानिक पुढार्यांनी गावकर्यांना विश्वासात घेऊन या महामार्गाचा विषय कायमस्वरूपी मार्गी लावण्याची मागणी जोर धरत आहे.



पावसाळा अवघ्या एक महिन्यांवर येऊन ठेपलेला असताना प्रशासन मात्र अद्याप झोपेत असल्याचे दिसत आहे. प्रशासनाने २८ मार्चपूर्वी अतिक्रमण हटवण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिका, भूमिअभिलेख आणि पोलीस प्रशासन यांची संयुक्त कारवाई आखली होती. मात्र १५ मे उजाडली, तरी प्रत्यक्ष कारवाईचा पत्ता नाही. रस्त्याच्या दुतर्फा काही अनधिकृत बांधकामे, मोजमापाची प्रतीक्षा आणि यंत्रणांची उदासीनता यामुळे संपूर्ण प्रकल्प ठप्प झाला आहे.या रस्त्याचे काम रखडल्याने केवळ प्रवासाचा त्रास नाही, तर परिसरातील नागरिकांना धूळ, कोंडी,चिखल आणि अपघातांचा धोका वाढला आहे. व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान, विद्यार्थ्यांना होणारी गैरसोय आणि रुग्णवाहिकांना अडचणी असे विविध स्तरांवर याचे गंभीर परिणाम दिसत आहेत.जामखेड सौताडा महामार्गाची अवस्था प्रचंड खराब झाल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ८० कोटी रुपये या रस्त्यासाठी देऊन गेल्या तीन वर्षांपूर्वी रस्त्याच्या कामालाही सुरुवात झाली राष्ट्रीय महामार्ग विभागाने पंचदेवलाय मंदिर कर्जत फाटा ते खर्डा चौक व समर्थ हॉस्पिटल पासून पुढे बीड रोड पर्यंत दोन्ही बाजूने सिमेंट काँक्रीटीकरण केले आहे मात्र गेल्या दोन महिन्यापासून शहरातील काम बंद करून सौताडा घाटात काम सुरु करण्यात आले होते वास्तविक पाहत शहरातील अपूर्ण कामे प्राध्यान्याने पूर्ण करणे गरजेचे असताना खर्डा चौक ते समर्थ हॉस्पिटल पर्यंत रस्त्याचे काम जाणीवपूर्णक अपूर्ण ठेवण्यात आले आहे यातील खर्डा चौक ते बीड कॉर्नर पर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमनाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने या रस्त्याचे काम बंद करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले मात्र जामखेड तालुक्याला गेल्या एक नव्हे तर दोन दोन आमदार लाभलेले असतानाही एकही आमदाराने स्वतःहून पुढाकार घेऊन या महामार्गावरील अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेतला नसल्याचे चित्र आहे, रोहित पवार हे विधानसभेवर आमदार असून प्रा राम शिंदे हे विधानपरिषदेचे सभापती आहेत दोन्ही आमदारांचे राजकीय ''वजन'' असतानाही या रस्त्याचे काम कास काय अपूर्ण ठेवण्यात आले हा प्रश्न उपथितय राहत आहे,विधानसभा निवडणुकीआधी रस्त्याच्या कामाने जोर धरला असताना निवडणूक डोळ्या समोर ठेऊन कामे बंद तर केली नाही ना अशाही चर्चाना तोंड फुटले आहे सध्या रस्त्याचे काम अपूर्ण असल्याचे नागरिकाचे प्रचंड हाल होत आहे याकडे दोन्ही आमदारांनी जातीने लक्ष घालून लवकरात लवकर या अपूर्ण कामे पुन्हा सुरु करण्याची मागणी जोर धरत आहे.

Comments
Add Comment

गणपतीला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटीच्या 2500 फेऱ्या

कोकणात गणेशोत्सवासाठी येणार असलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी अडीच हजार एसटी गाड्यांचे नियोजन

'शिंदेंना लॉटरी लागली, मुख्यमंत्री झाले, पण टिकवता आली... मंत्री गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना डिवचलं

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचा वाद हा काही राज्याला नवा नाही. मंत्री गणेश नाईक

पुणे महानगरपालिकेच्या सुरक्षेची कमान तृतीयपंथीयांच्या हाती

पुणे : पुणे महानगरपालिकेमध्ये सध्या सुरक्षेची जबाबदारी काही तृतीयपंथीयांवर देण्यात आलेली आहे. सुरुवातीच्या

पोलीस अधिकाऱ्याची आंदोलकाला फिल्मी स्टाईल लाथ का मारली? पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं

गेल्या दोन दिवसापासून जालन्यातील हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पोलीस उपाधिक्षक अनंत कुलकर्णी असं या अधिकाऱ्यांचे

कोकणात पुढील 4 दिवस विजांसह मुसळधार पावसाचा इशारा

राज्यभरात सध्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून कोकणात पुढील ४ दिवस विजांसह मुसळधार पावसाचा इशारा

Pune Accident News : ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’चा कहर, मद्यधुंद चालकाने ठोकली चक्क डीसीपींची गाडी

पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे आणि त्यातून होणारे अपघात (Pune Accident News) या घटनांत