Friday, May 16, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

पाकिस्तानवर लक्ष ठेवण्यासाठी रविवारी उपग्रह अंतराळात पाठवणार

पाकिस्तानवर लक्ष ठेवण्यासाठी रविवारी उपग्रह अंतराळात पाठवणार
श्रीहरिकोटा : तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी भारत रविवारी एक उपग्रह अंतराळात पाठवणार आहे. पीएसएलव्ही - सी ६१ रॉकेटमधून हा उपग्रह अंतराळात पाठवला जाणार आहे. हे पीएसएलव्हीचे ६३ वे आणि इस्रोच्या रॉकेटचे १०१ वे प्रक्षेपण आहे. इस्रोच्या नियोजनानुसार रविवार १८ मे रोजी सकाळी पाच वाजून ५९ मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही - सी ६१ रॉकेटचे प्रक्षेपण होणार आहे.



प्रक्षेपण प्रक्रियेचा भाग म्हणून पीएसएलव्हीला पेलोड इंटिग्रेशन फॅसिलिटीमधून श्रीहरिकोटा येथील स्पेसपोर्टवरील मोबाईल सर्व्हिस टॉवरमध्ये पुढील टप्प्यासाठी आणण्यात आले आहे.



इस्रोचा EOS-09 हा एक पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. हा उपग्रह कोणत्याही वातावरणात आणि कोणत्याही परिस्थितीत भारताच्या देखरेखीच्या क्षमतेत वाढ करणार आहे. यामुळे पाकिस्तानच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे. हा उपग्रह सी-बँड सिंथेटिक अॅपार्चर रडारने सुसज्ज आहे ज्यामुळे कोणत्याही वातावरणात २४ तास उच्च क्षमतेचे अर्थात हाय रिझोल्युशनचे फोटो घेणे या उपग्रहाला शक्य आहे.
Comments
Add Comment