
रत्नागिरी : शासनाने राज्यातील सर्व शाळांना जिओ टॅगिंग बंधनकारक केले आहे. तसे पत्र शिक्षण आयुक्त सचिन्द्र सिंह यांनी काढले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील सर्व शाळांना जिओ टॅगिंग करावे लागणार आहे.
महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर संस्थेद्वारे शालेय शिक्षण विभागातील सर्व प्रकारच्या शाळांचे भौतिक ठिकाण छायाचित्रांसह टॅग करून माहिती भरण्यासाठी महा स्कूल जीआयएस अॅप विकसित केले आहे. या अॅपवर माहिती भरावी लागणार आहे.
शाळांमध्ये इंटरनेट सुविधा नसल्याने फोटो अपलोड करताना अनेक अडचणी येत आहेत. राज्यात काही ठिकाणी कागदोपत्री शाळा असल्याचे बोलले जाते. एकही विद्यार्थी, शाळेसाठी इमारत नसतानाही केवळ कागदोपत्री शाळा चालवल्या जात असल्याची चर्चा नेहमीच शिक्षण विभागात असते. या सगळ्या गोष्टींना आता आळा बसणार आहे.