CRPF Dog: नक्षलविरोधी मोहिमेदरम्यान सीआरपीएफच्या श्वानाचा मृत्यू; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

  31

छत्तीसगड: छत्तीसगडच्या करेगुट्टा हिल्स भागात नक्षलविरोधी मोहिमेदरम्यान सीआरपीएफचा प्रशिक्षित श्वान के९ रोलो शहीद झाला. त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.


छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये एका विशेष मोहिमेदरम्यान सीआरपीएफचा के-९ रोलो या शूर श्वानाचे निधन झाले आहे.  रोलोचामोहिमेदरम्यान अचानक मधमाशांच्या थव्याने केलेल्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. सर्वतोपरी प्रयत्न करूनही त्याला वाचवता आलं नाही. रोलो हा बेल्जियन मॅलिनॉइस जातीचा कुत्रा होता. तो छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर तैनात होता. तो स्फोटके शोधण्यात आणि गस्त घालण्यात तज्ज्ञ होता.


सीआरपीएफ आणि छत्तीसगड पोलिस करेगुट्टा टेकड्यांमध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे नक्षलविरोधी ऑपरेशन राबवत होते. हे ऑपरेशन सुमारे तीन आठवडे चालले. या कारवाईअंतर्गत, जेव्हा सीआरपीएफ आणि छत्तीसगड पोलिसांचे पथक करेगुट्टा टेकड्यांमध्ये शोध मोहीम संपवून परतत होते, तेव्हा मधमाश्यांच्या एका मोठ्या थव्याने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी, मधमाश्यांच्या चाव्यापासून बचाव करण्यासाठी व्हॅनने K9 रोलोला पॉलिथिन शीटने झाकले. मात्र, त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला, कारण अनेक मधमाश्या त्याच्या चादरीत घुसल्या, यामुळे मधमाश्यांच्या तीव्र चाव्याच्या वेदनेने तो चादरीच्या बाहेर आला. तो चादरीच्या बाहेर येताच त्याला आणखी मधमाश्यांनी चावा घेतला. ज्यामुळे तो बेशुद्ध पडला. असे तेथे उपस्थित असलेल्या सीआरपीएफच्या जवानांनी माहिती दिली.


 


घटनास्थळी उपस्थित असलेल्या सैनिकांनी त्याला तात्काळ आपत्कालीन उपचार देण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले पण अत्यंत वेदना आणि त्रासामुळे के९ रोलोचा वाटेतच मृत्यू झाला. नंतर पशुवैद्यकाने त्याला मृत घोषित केले.



स्फोटके शोधण्यात आणि गस्त घालण्यात तरबेज होता के ९ रोलो 


के-९ रोलोचा जन्म ५ एप्रिल २०२३ रोजी डीबीटीएसमध्ये झाला. डीबीटीएसमध्येच, बॅच क्रमांक ८० अंतर्गत, त्याला पायदळ गस्त, स्फोटक शोध आणि हल्ला यांचे प्रशिक्षण देण्यात आले.  तो स्फोटक शोधणे आणि गस्त घालण्यास तरबेज होता.  शत्रूविरुद्ध हल्ल्याचं प्रशिक्षण घेऊन तो एप्रिल 2024 मध्ये 228 बीएनमध्ये तैनात झाला होता. रोलोने अनेक नक्षलविरोधी कारवायांमध्ये आयईडी शोधून काढले होते. तो एक निष्ठावंत सैनिक होता. त्यांनी नक्षलवाद्यांच्या लपण्याच्या जागा आणि स्फोटके शोधण्यात सीआरपीएफला मदत केली. या कारणास्तव, त्यांच्या हौतात्म्याचा सन्मान करण्यासाठी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

Comments
Add Comment

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद एनडीआरएफच्या

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण

तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे

Crime News : धक्कादायक! महाराष्ट्रातील ७० वर्षीय आजीवर पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार; ब्लँकेटने झाकले अन्...

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पहलगाममध्ये