सचिन तेंडुलकर, धोनीनंतर टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून विराट- रोहितची जर्सी क्रमांक होणार निवृत्त?

मुंबई : भारताचा यशस्वी कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने टी-२० नंतर लगेच कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची गणना जगातील महान क्रिकेटपटूंमध्ये केली जाते, त्यामुळे टी-२० आणि कसोटी क्रिकेट सामन्यात कोणत्याही खेळाडूला १८ किंवा ४५ क्रमांकाची जर्सी परिधान करता येणार नाही, अशी चर्चा सुरु झाली आहे.पंरतु, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे भारतातच नव्हे तर जगभरात चाहते आहेत. रोहित शर्मा हा ४५ क्रमांकाची जर्सी आणि विराट कोहली १८ क्रमाकांची जर्सी घालतो. भारतीय क्रिकेट संघाला यशाच्या शिखरावर पोहोचवण्यात दोघांनी आतापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून जर्सी क्रमांक ४५ आणि जर्सी क्रमांक १८ निवृत्त होतील का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत घोषणा झाली नाही.

महत्त्वाचे म्हणजे, आतापर्यंत फक्त दोन भारतीय खेळाडूंनाच हा सन्मान मिळाला आहे. सर्वात प्रथम बीसीसीआयने सचिन तेंडुलकरची १० क्रमांकाची जर्सी निवृत्त केली. त्यानंतर धोनीची ७ क्रमांकाची जर्सी कोणत्याही खेळाडूला परिधान करता येणार नाही, असे बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले. आयपीएलनंतर भारतीय संघ इंग्लंडचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात भारत इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघ कशी कामगिरी बजावतो? याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

सुपरसंडे : पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताची दमदार सुरुवात

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकून

भारत पाकिस्तान सामन्यावेळी हस्तांदोलन झाले की नाही ?

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्याच्या

IND vs PAk : वर्चस्व राखण्यासाठी 'हरमनसेना' सज्ज; पाकिस्तानचा 'झिरो' रेकॉर्ड मोडणार?

कोलंबो : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये रविवार, ५ ऑक्टोबर रोजी क्रिकेट चाहत्यांना

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा