पावसाळ्यात समुद्राला उधाण भरतीचे १७ धोक्याचे दिवस!

  70

नागरिकांना सतर्कतेचा इशारा


ठाणे : यावर्षीचा पावसाळा अधिक सतर्कतेचा असणार आहे. जून ते ऑगस्टदरम्यान एकूण १७ दिवस असे असतील की ज्यादिवशी समुद्रात साडेचार मीटरपेक्षा अधिक उंच भरती होणार आहे. हे दिवस पर्यावरणीय दृष्टिकोनातून आणि नागरी सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानले जात असल्याचे ज्येष्ठ खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.


समुद्रकिनारी वसलेल्या महानगरात पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा समुद्रात भरतीचा काळ असतो आणि त्याचवेळी जोरदार पाऊस पडतो, तेव्हा समुद्राचे पाणी शहरात परत येण्याची शक्यता वाढते. अशावेळी निचऱ्याचा वेग मंदावतो आणि रस्त्यांवर पाणी साचते. परिणामी, मुंबई ठाण्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. हा धोका लक्षात घेता, महापालिका प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि स्थानिक नागरिकांनी या दिवसांत अधिक सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे.



उधाण भरतीचे धोकादायक दिवस पुढीलप्रमाणे


जून
२४ जून (सकाळी ११:१९ – ४.५८ मीटर)
२५ जून (दुपारी १२:०६ – ४.७३ मीटर)
२६ जून (दुपारी १२:५१ – ४.७८ मीटर)
२७ जून (दुपारी १:३४ – ४.७५ मीटर)
२८ जून (दुपारी २:१४ – ४.६५ मीटर)
जुलै
१२ जुलै (दुपारी १:१६ – ४.५३ मीटर)
१३ जुलै (दुपारी १:४८ – ४.५८ मीटर)
१४ जुलै (दुपारी २:२२ – ४.५६ मीटर)
२४ जुलै (सकाळी ११:५८ – ४.५५ मीटर)
२५ जुलै (दुपारी १२:३८ – ४.६४ मीटर)
२६ जुलै (दुपारी १:१५ – ४.६६ मीटर)
२७ जुलै (दुपारी १:४९ – ४.६० मीटर)
ऑगस्ट
१० ऑगस्ट (दुपारी १२:४९ – ४.६० मीटर)
११ ऑगस्ट (दुपारी १:२१ – ४.६६ मीटर)
१२ ऑगस्ट (दुपारी १:५४ – ४.६३ मीटर)
१३ ऑगस्ट (दुपारी २:२८ – ४.५१ मीटर)
२४ ऑगस्ट (दुपारी १२:४८ – ४.५१ मीटर)


या १७ दिवसांपैकी २६ जून रोजी सर्वाधिक उंच भरती (४.७८ मीटर) असणार आहे, जी या हंगामातील उच्चांक ठरेल. या भरतीच्या पातळीमध्ये फक्त समुद्रात वाढणाऱ्या पाण्याची उंची समाविष्ट आहे,





  • या दिवसांत समुद्रकिनारी जाणे टाळावे





  • वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा





  • हवामान खात्याच्या व सतर्कतेच्या सूचना नियमितपणे तपासाव्यात





  • शक्य असल्यास घरातच थांबावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा



Comments
Add Comment

पापाची हंडी आम्ही फोडली, लोणी कुणी खाल्लं? मुंबईच्या दहीहंडी उत्सवातून फडणवीसांनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग

मुंबई: राजधानी मुंबईसह उपनगरांमध्ये दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. या उत्सवाला राजकीय रंगाचीही

बीएमसीच्या ‘पार्किंग’साठी ‘वृक्षतोड’

मुंबई : आचार्य अत्रे मेट्रो स्टेशनजवळ आठ झाडे तोडण्याच्या आणि चार इतर झाडांचे स्थलांतर करण्याच्या 'बृहन्मुंबई

गर्भवती बांगलादेशी महिला जेजे रुग्णालयातून फरार, पोलिसांचा शोध सुरू

मुंबई: भारतात बेकायदेशीर वास्तव्यासाठी नवी मुंबई येथून एका २१ वर्षीय बांगलादेशी महिलेला अटक करण्यात आली होती.

घाटकोपर येथील दहीहंडीद्वारे 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये सहभागी सैनिकांच्या शौर्याला सलाम- देवेंद्र फडणवीस

मुंबई: आज मुंबईत सर्वत्र दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळाला. यादरम्यान जय जवान आणि कोकणनगर दहीहंडी पथकाने दहा थर

‘दहीहंडी’द्वारे गोविंदा पथकांचा भारतीय सैन्य दलाच्या शौर्याला सलाम

मुंबई शहर व उपनगरातील विविध दहीहंडी उत्सव कार्यक्रमांना मुख्यमंत्र्यांची उपस्थिती मुंबई : ‘ऑपरेशन सिंदूर’

दहीहंडीला लागले गालबोट, आतापर्यंत झाले एवढे मृत्यू

मुंबई : दहीहंडी उत्साहात साजरी होत असताना मुंबईत एक दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे दहीहंडी उत्सवालाच गालबोट