Saturday, August 16, 2025

पावसाळ्यात समुद्राला उधाण भरतीचे १७ धोक्याचे दिवस!

पावसाळ्यात समुद्राला उधाण भरतीचे १७ धोक्याचे दिवस!

नागरिकांना सतर्कतेचा इशारा

ठाणे : यावर्षीचा पावसाळा अधिक सतर्कतेचा असणार आहे. जून ते ऑगस्टदरम्यान एकूण १७ दिवस असे असतील की ज्यादिवशी समुद्रात साडेचार मीटरपेक्षा अधिक उंच भरती होणार आहे. हे दिवस पर्यावरणीय दृष्टिकोनातून आणि नागरी सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानले जात असल्याचे ज्येष्ठ खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

समुद्रकिनारी वसलेल्या महानगरात पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा समुद्रात भरतीचा काळ असतो आणि त्याचवेळी जोरदार पाऊस पडतो, तेव्हा समुद्राचे पाणी शहरात परत येण्याची शक्यता वाढते. अशावेळी निचऱ्याचा वेग मंदावतो आणि रस्त्यांवर पाणी साचते. परिणामी, मुंबई ठाण्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. हा धोका लक्षात घेता, महापालिका प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि स्थानिक नागरिकांनी या दिवसांत अधिक सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

उधाण भरतीचे धोकादायक दिवस पुढीलप्रमाणे

जून २४ जून (सकाळी ११:१९ – ४.५८ मीटर) २५ जून (दुपारी १२:०६ – ४.७३ मीटर) २६ जून (दुपारी १२:५१ – ४.७८ मीटर) २७ जून (दुपारी १:३४ – ४.७५ मीटर) २८ जून (दुपारी २:१४ – ४.६५ मीटर) जुलै १२ जुलै (दुपारी १:१६ – ४.५३ मीटर) १३ जुलै (दुपारी १:४८ – ४.५८ मीटर) १४ जुलै (दुपारी २:२२ – ४.५६ मीटर) २४ जुलै (सकाळी ११:५८ – ४.५५ मीटर) २५ जुलै (दुपारी १२:३८ – ४.६४ मीटर) २६ जुलै (दुपारी १:१५ – ४.६६ मीटर) २७ जुलै (दुपारी १:४९ – ४.६० मीटर) ऑगस्ट १० ऑगस्ट (दुपारी १२:४९ – ४.६० मीटर) ११ ऑगस्ट (दुपारी १:२१ – ४.६६ मीटर) १२ ऑगस्ट (दुपारी १:५४ – ४.६३ मीटर) १३ ऑगस्ट (दुपारी २:२८ – ४.५१ मीटर) २४ ऑगस्ट (दुपारी १२:४८ – ४.५१ मीटर)

या १७ दिवसांपैकी २६ जून रोजी सर्वाधिक उंच भरती (४.७८ मीटर) असणार आहे, जी या हंगामातील उच्चांक ठरेल. या भरतीच्या पातळीमध्ये फक्त समुद्रात वाढणाऱ्या पाण्याची उंची समाविष्ट आहे,

  • या दिवसांत समुद्रकिनारी जाणे टाळावे

  • वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा

  • हवामान खात्याच्या व सतर्कतेच्या सूचना नियमितपणे तपासाव्यात

  • शक्य असल्यास घरातच थांबावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >