
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव या ठिकाणी शेतातील गिन्नी गवतामध्ये शेळी हाकलल्याच्या कारणातून महिलेवर कुऱ्हाडीने वार केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल असून जखमी महिलेवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत उपचाराच्या दरम्यान पोलिसांनी घेतलेल्या जबाबावरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे
याबबत सविस्तर माहिती अशी कि श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्यादी रुख्मिणी संतोष जाधव, वय ४२ वर्षे, धंदा शेती, रा. पेडगाव रोड, चोराचीवाडी, ता. श्रीगोंदा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि समक्ष जिल्हा शासकीय रुग्णालय, अहिल्यानगर येथे जनरल वॉर्ड क्रमांक ०३ मध्ये उपचार घेत असुन पूर्ण पणे शुद्धीवर असताना, विचारले वरुन लिहुन देते की शेती व्यवसाय करुन कुटुंबाची उपजीविका भागवितो आमच्या घराचे जवळ योगेश पाडुरंग जाधव हा त्याची पत्नी ज्योती योगेश जाधव तसेच त्याची मेव्हणी यांच्यासह राहण्यास आहे. योगेश जाधव व आमची जमीन शेजारी शेजारी असल्याने ते नेहमी आम्हाला काही ना काही कारणावरुन शिवीगाळी करत असतात.दि ७ मे रोजी सायंकाळी त्याचे पती व मुलगा असे श्रीगोंदा येथे असताना, घरी फिर्यादी व सासु असे असताना फिर्यादी जनावरांना कुट्टी काढत असताना,त्यांचे शेजारी राहणारे योगेश पाडुरंग जाधव,ज्योती योगेश जाधव,अश्विनी सागर जाधव, सर्व रा. चोराचीवाडी, ता. श्रीगोंदा असे शिवीगाळ करत आले तेव्हा योगेश जाधव याच्या हातात कु-हाड होती त्यानंतर त्यांनी फिर्यादीला तुम्ही आमच्या शेळ्या तुमच्या गिन्नी गवतामधुन का हाकलल्या असे म्हणून शिवीगाळ करुन योगेश पाडुरंग जाधव याने त्याचे हातातील कु-हाडीने फिर्यादीच्या डोक्यात पाठीमागे वार केला त्यामुळे फिर्यादी खाली पडली असता, ज्योती जाधव हिने फिर्यादीस जिवे मारण्याच्या उद्देशाने विषारी औषधाची बाटली घेवुन फिर्यादीच्या तोडांत ओतण्याचा प्रयत्न केला त्यावेळी हाताला झटका मारल्यामुळे त्या विषारी बाटलीमधील विषारी औषध फिर्यादीच्या तोडांवर तसेच डोळ्यात पडले. त्यानंतर आश्विनी सागर जाधव हिने कुट्टी जवळ पडलेला विळा हातात घेवुन फिर्यादीचे उजवे कानावर मारुन दुखापत केली.
त्यावेळी झटापटीत माझ्या गळ्यातील सोन्याचे अंदाजे दिड तोळे वजनाचे मंगळसूत्र तुटुन गहाळ झाले आहे. आमच्या भांडणाचा आवाज ऐकुन फिर्यादीची सासु देवुबाई ह्या घरातुन पळत भांडणे सोडविण्यासाठी आल्या असता, त्यांना सुध्दा धक्का बुक्की करुन लाथाबुक्यांने मारहाण केली त्यावेळी फिर्यादीच्या डोक्यातुन जास्त रक्त येवून चक्कर येऊन पडल्याने आज तु वाचलीस असे म्हणून जिवे मारण्याची धमकी देऊन निघुन गेले.
त्यानंतर थोड्या वेळाने फिर्यादीचे पती व मुलगा असे घरी आल्यानंतर त्यांनी मला श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे नेले त्यानंतर माझे पती यांनी मला उपचार करीता ग्रामिण रुग्णालय, श्रीगोंदा येथे नेले.
त्यानंतर तेथील डॉक्टरांनी फिर्यादीस पुढील उपचार करीता जिल्हा शासकीय रुग्णालय, अहिल्यानगर येथे पाठविले असुन सध्या त्यांच्यावर उपचार चालू आहे. सरकारी दवाखान्यात पोलिसांनी घेतलेल्या जबाबावरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भा न्या स चे कलम १०९, ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३२४(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम करत आहेत. यामध्ये ज्योती योगेश जाधव,अश्विनी सागर जाधव, सर्व रा. चोराचीवाडी, ता. श्रीगोंदा या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात
घेतले आहे.
जुन्या वादातून पुन्हा वाद झाल्याची चर्चा
जाधव कुटुंबीयांमध्ये काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात वाद असून काही गुन्हे न्यायप्रविष्ठ आहेत ते निकालावर असल्याची माहिती समजते त्यामुळेच हा प्रकार घडला असल्याची माहिती गावातील लोकांनी बोलताना दिली आहे त्यामुळे जुन्या वादातून नवा वाद झाला असल्याची जोरदार चर्चा ऐकण्यास मिळत असल्यामुळे पोलिसांनी त्याचीही खातरजमा करण्याची गरज निर्माण झाली आहे.