Thursday, May 15, 2025

विदेशताज्या घडामोडी

Mukesh Ambani Meets Donald Trump: मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्पची भेट, कतारच्या लुसैल पॅलेसमध्ये केले स्टेट डिनर

Mukesh Ambani Meets Donald Trump: मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्पची भेट, कतारच्या लुसैल पॅलेसमध्ये केले स्टेट डिनर

कतार: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सन्मानार्थ कतारने आयोजित केलेल्या स्टेट डिनरमध्ये भारतीय अब्जाधीश  आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी देखील उपस्थिती लावली. यादरम्यान मुकेश अंबानी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. एलोन मस्कदेखील याप्रसंगी उपस्थित होते.


कतारच्या लुसैल पॅलेसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या खास मेजवानीचे चित्रीकरण करण्यात आले. ज्यात  ट्रम्प , एलॉन मस्क तसेच मुकेश अंबानींसह अनेक उच्चपदस्थ पाहुण्यांचे स्वागत केले जात होते.



मुकेश अंबानी यांनी घेतली ट्रम्प यांची भेट


स्टेट डिनरला जाण्यापूर्वी मुकेश अंबानी यांनी ट्रम्पसोबत काही मिनिटे चर्चा केली,  त्यांनी कतारचे अमीर तमीम बिन हमद अल थानी यांच्याशी देखील हस्तांदोलन केले. त्यानंतर अंबानी अमेरिकेचे वाणिज्य सचिव स्टीव्ह लुटनिक यांच्याशीदेखील गप्पा मारताना आणि हसताना दिसले.


या भव्य कार्यक्रमात उपस्थित असलेल्या उच्चभ्रू पाहुण्यांमध्ये न्यूजमॅक्सचे संस्थापक ख्रिस रुडी, ब्लॅकस्टोनचे सीईओ स्टीफन श्वार्झमन आणि एलोन मस्कचे जवळचे मित्र अँटोनियो ग्रासियास यांचादेखील समावेश होता.



काय आहे भेटीचा उद्देश?


कतारच्या सरकारी गुंतवणूक निधी QIA (कतार गुंतवणूक प्राधिकरण) ने आधीच रिलायन्सच्या व्यवसायात गुंतवणूक केली आहे. अंबानी यांचे गुगल आणि मेटा सारख्या मोठ्या अमेरिकन टेक कंपन्यांशीही खोल व्यावसायिक संबंध आहेत. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज अमेरिका आणि कतार या दोन्ही देशांशी आपले संबंध आणखी मजबूत करू इच्छित आहे. या भेटीत कोणतीही मोठी गुंतवणूक किंवा व्यावसायिक करार जरी झाला नसला, तरी ही एक औपचारिक भेट ठरली.



ट्रम्प यांची सौदी अरेबियातून दौऱ्याची सुरुवात


ट्रम्प यांच्या मध्य पूर्व दौऱ्यातील कतार हा दुसरा थांबा होता, ज्यामध्ये कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीच्या भेटींचा समावेश आहे. कतारला जाण्यापूर्वी त्यांनी सौदी अरेबियातून दौऱ्याची सुरुवात केली. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, ट्रम्प यांनी बुधवारी कतारला इराणवरील आपला प्रभाव वापरून देशाच्या नेतृत्वाला अमेरिकेशी करार करण्यासाठी राजी करण्याचे आवाहन केले. तीन देशांच्या मध्यपूर्व दौऱ्याचा भाग म्हणून आखाती राष्ट्राला भेट देणाऱ्या ट्रम्प यांनी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांनी त्यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या राजकीय मेजवानीत हे आवाहन केले.

Comments
Add Comment