Thursday, May 15, 2025

महामुंबईमहाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

मेट्रो प्रकल्प २०२७ पर्यंत पूर्ण करू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मेट्रो प्रकल्प २०२७ पर्यंत पूर्ण करू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई : मुंबई आणि आसपासच्या शहरांसाठी ज्या मेट्रो प्रकल्पांचे काम २०१४ ते २०१९ दरम्यान सुरू करण्यात आले त्या प्रकल्पांना २०२७ अखेर पर्यंत पूर्ण करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मिरा-भाईंदर दहिसर मेट्रो ९ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीवेळी ते बोलते होते. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. मिरा-भाईंदरपासून पुढे विरारपर्यंत मेट्रोचा विस्तार केला जाणार आहे. त्यामुळे लवकरच नागरिकांना विरारपर्यंत मेट्रोने प्रवास करता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.


पालघर येथील वाढवण बंदर बुलेट ट्रेनने जोडले जाणार आहे. बंदराला मेट्रोने ही कसे जोडते येईल, यासाठी विचार सुरू आहे; असेही मुख्यमंत्री म्हणाले. मिरा-भाईंदर-दहिसर मेट्रो ही चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर नागरिकांच्या सेवेत येणार असल्याचे त्यांनी सांगितले. चाचणी सुरू असलेल्या मिरा-भाईंदर-दहिसर मेट्रोमुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूककोंडीतून दिलासा मिळणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.


मिरा-भाईंदर मेट्रो प्रकल्पाला महायुती सरकारने २०१८ मध्ये मंजुरी दिली. मात्र, त्यानंतर स्थगिती सरकारमुळे मेट्रो कामाला मधल्या काळात ब्रेक लागला होता. आता पुन्हा आमचे सरकार येताच, आम्ही मेट्रो कामातील स्पीड ब्रेकर काढून टाकला; असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव यांना नाव न घेता टोला लगावला.

Comments
Add Comment