
नवी दिल्ली : पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला भारताने जबरदस्त मोठा झटका दिला आहे. देशातील मुंबई, दिल्ली, बेंगळुरु, चेन्नईसारख्या अत्यंत संवेदनशील विमानतळांवर सेवा देणाऱ्या तुर्कीच्या Celebi NAS Airport Services India Ltd या कंपनीचा सिक्युरिटी क्लिअरन्स भारत सरकारने रद्द केला आहे.
हा निर्णय राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी घेतल्याचे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. या कंपनीला २०२२ मध्ये सुरक्षा मंजुरी मिळाली होती, मात्र तुर्की सरकारने अलीकडेच पाकिस्तानला ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर पाठिंबा दिल्यामुळे भारतात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Revocation of Security Clearance of Celebi, Turkish company operating ground handling services at Indian Airports.
We have received requests from across India to ban Celebi NAS Airport Services India Ltd, a Turkish company operating ground handling services at Indian airports.… pic.twitter.com/FGpuLuHBbh
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) May 15, 2025
सेलेबी ही तुर्कीची कंपनी भारतात ९ प्रमुख विमानतळांवर ग्राउंड हँडलिंग व कार्गो सेवा पुरवत होती. मुंबई, बंगळुरुसह अनेक विमानतळांवर सेवा देणारी कंपनी Celebi NAS Airport Services India Ltd ही तुर्कीतील Celebi Aviation Holdings या कंपनीची भारतीय शाखा आहे. २००७ मध्ये भारतात प्रवेश केल्यानंतर, या कंपनीने दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद, कोचीन, अहमदाबाद, गोवा, कन्नूर आणि चेन्नई या विमानतळांवर भूमिगत हँडलिंग आणि कार्गो ऑपरेशन्स सुरू केले आहेत. कंपनीने २०२३ मध्ये चेन्नई विमानतळावरही भूमिगत हँडलिंग सेवा सुरू केली होती.

वॉशिंग्टन / दोहा : "मी थेट शांती करार केला असं म्हणणार नाही, पण मदत केली हे नक्की!", अशी 'हाफ-मेडिएशन' (पूर्ण श्रेय न घेता हातभार लावल्याचा दावा) कबुली देत ...
आता तिचा परवाना रद्द झाल्याने या ठिकाणी नव्या सेवा पुरवठादारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी नुकतीच या कंपनीविरोधात तक्रार करत तिचा परवाना रद्द करण्याची मागणी केली होती. भारत सरकारने हा मुद्दा गंभीरतेने घेत, "राष्ट्रीय हित आणि सुरक्षेला प्राधान्य" देत कारवाई केली.
दरम्यान, तुर्की आणि अझरबैजानने पाकिस्तानच्या बाजूने उघडपणे भूमिका घेतल्याने देशभरात संतापाची लाट आहे. भारताने तुर्कीला भूकंपाच्या काळात मदत केली होती, त्यानंतर तुर्कीकडून असे वर्तन दुहेरी धोरणाचे प्रतीक मानले जात आहे.
ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म्स आणि ट्रॅव्हल कंपन्यांनी तुर्की व अझरबैजानच्या प्रवासाबाबत अॅडव्हायजरी जाहीर केल्या असून, "बॉयकॉट तुर्की" मोहिमेनेही जोर धरला आहे.