Thursday, May 15, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

बीअर शॉपी, वाईन शॉप, ढाबा, हॉटेलात दारू प्याल तर मालकाला शिक्षा! हॉटेल, ढाबा मालकांचे धाबे दणाणले!

बीअर शॉपी, वाईन शॉप, ढाबा, हॉटेलात दारू प्याल तर मालकाला शिक्षा! हॉटेल, ढाबा मालकांचे धाबे दणाणले!

मुंबई : ढाबा, हॉटेल, खानावळी आणि महामार्गावरील अनेक बीअर शॉपी, वाईन शॉप या ठिकाणी राजरोसपणे ग्राहकांना दारू पाजणाऱ्या मालकांची आता खैर नाही! परवाना नसताना दारू पाजणाऱ्या ढाबा मालकांवर आता ५० हजार रुपये दंड किंवा थेट ५ वर्षांची शिक्षा होणार आहे.


राज्यातील उत्पादन शुल्क विभागाने याप्रकरणी कारवाईचे चक्र सुरू केले असून "दारू परवाना नसेल, तर मद्यपानास थारा नाही," असा स्पष्ट संदेश दिला आहे. अनेक ठिकाणी बीअर, वाईन शॉपच्या नावाखाली ढाब्यांमध्ये दारू विक्री व सेवन सुरू असून, काही ठिकाणी तर बनावट मद्यही ग्राहकांच्या ताटात वाढले जात आहे.



यामुळे आरोग्याचा धोका तर आहेच, पण कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही गंभीर परिणाम होतात. या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग सक्रिय झाला आहे. विभागाकडून कारवाया सुरू करण्यात आल्या असून, आता ढाबे मालकांनाच शिक्षा केली जाणार आहे. त्यामुळे आता ढाबा मालकांचे धाबे दणाणले आहेत.


त्यामुळे आता ढाबा मालकांनी आपल्या परिसरात दारू सेवनास परवानगी देऊ नये, अन्यथा कोर्टाची पायरी चढण्याची वेळ येईल.


राज्य सरकारने निर्धारित परवानगीशिवाय मद्यपान रोखण्यासाठी कायदेशीर तरतुदींची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे ढाब्यांमध्ये दारू प्यायची की खायचं, हे आता ग्राहक आणि मालकांनी ठरवावं लागणार आहे.

Comments
Add Comment