
नाशिक : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आता पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत. १६ मे रोजी संध्याकाळी ७:१५ वाजता गोदाघाट येथील देवमामलेदार यशवंत महाराज पटांगणात, वसंत व्याख्यानमालेच्या १६व्या पुष्पात भुजबळांची जळजळीत तोफ धडाडणार आहे.
भुजबळ यांचे भाषण ‘ओबीसी आरक्षण आणि जातीनिहाय जनगणना’ या ज्वलंत विषयावर असून, सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या आदेशामुळे या विषयाला नवसंजीवनी मिळाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीसाठी २७% आरक्षणासह निवडणुका घेण्याचे निर्देश कोर्टाने दिल्यानंतर राजकीय वातावरण आधीच तापले आहे.

नवी दिल्ली : राज्यपाल आणि राष्ट्रपतींना कायदेमंडळांनी मंजूर केलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा निश्चित करणाऱ्या सर्वोच्च ...
त्यातच केंद्र सरकारने पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेला जातगणनेचा निर्णय हा राजकीयदृष्ट्या महत्वाचा ठरतोय. गेल्या दशकभरापासून भुजबळ जातगणनेसाठी देशभरात आवाज उठवत आले आहेत. न्यायालयीन लढा असो वा संसदबाहेरील आंदोलन, भुजबळांचा पाठपुरावा थांबलेला नाही. ओबीसींच्या हक्कासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लढा दिला, तर जातीय जनगणनेसाठी संसदेत आणि रस्त्यावर आवाज उठवला आहे.
समता परिषदेच्या माध्यमातून जातीनिहाय विकासाचे आराखडे तयार करण्यासाठीची मागणी त्यांनी सातत्याने पुढे रेटली आहे.
आता या दोन्ही विषयांवर भुजबळ वसंत व्याख्यानमालेत काय ठाम भूमिका मांडतात, हे पाहणं राजकीय वर्तुळात उत्सुकतेचं ठरणार आहे.