
खासदार डॉ. सवरा यांच्या प्रयत्नांना यश
पालघर : पालघर जिल्ह्यातील नागरिकांची दीर्घकाळापासूनची मागणी अखेर पूर्ण झाली असून, बांद्रा टर्मिनस-भुज कच्छ एक्स्प्रेस आणि बीकानेर-दादर एक्स्प्रेस या दोन गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर पालघर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयामागे पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांचा सक्रिय आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा आहे. त्यांनी रेल्वेमंत्र्यांना भेटून तसेच संसदेत प्रश्न उपस्थित करून ही मागणी सातत्याने मांडली होती. जिल्ह्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाचा विचार करता, तसेच प्रवाशांच्या सुविधेसाठी हे थांबे आवश्यक असल्याचे डॉ. सवरा यांनी वेळोवेळी अधोरेखित केले होते. पालघर रेल्वे स्थानकावर दोन महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांचे थांबे प्रारंभी प्रायोगिक तत्त्वावर पालघर रेल्वे स्थानकावर निश्चित करण्यात आले आहेत.

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन दिग्गज खेळाडूंनी कसोटीतून निवृत्तीची घोषणा केल्याने भारतीय क्रिकेट संघाला कसोटी क्रिकेटमध्ये मोठा धक्का ...
पालघर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून, येथे वाढवण बंदर, विमानतळ प्रकल्प, तसेच तारापूर एमआयडीसी यांसारखी महत्त्वाची औद्योगिक केंद्रे कार्यरत आहेत. वाढती औद्योगिक गरज आणि प्रवाशांची संख्या लक्षात घेता, या थांब्यांची आवश्यकता होती. या निर्णयामुळे पालघर जिल्ह्याच्या नागरिकांना, उद्योग क्षेत्राला व प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, प्रवास अधिक सुलभ, सोयीस्कर आणि कार्यक्षम होणार आहे.