आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ २० जून रोजी प्रदर्शित होणार, ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : “तारे जमीन पर” च्या जादूला १८ वर्षांनंतर पुन्हा एकदा अनुभवण्याची वेळ आली आहे! आमिर खान एक नवीन, हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करण्यास सज्ज झाले आहेत.


आमिर खान त्याच्या बहुप्रतिक्षित फॅमिली एंटरटेनर ‘सितारे जमीन पर’ द्वारे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतत आहे. ही २००७ मधील सुपरहिट चित्रपट ‘तारे जमीन पर’ची स्पिरिचुअल सिक्वेल मानली जाते. पोस्टरने आधीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती आणि आता अखेर या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर प्रेम, हास्य आणि आनंदाने परिपूर्ण आहे — एक परिपूर्ण सिनेमॅटिक अनुभव!


चित्रपटाचा टॅगलाईन आहे — “सबका अपना अपना नॉर्मल”, जी सर्वांना स्वीकारण्याचा आणि समावेशकतेचा संदेश देते. ट्रेलरमध्ये आमिर खान एका बास्केटबॉल कोचच्या भूमिकेत दिसत आहेत, जो बौद्धिक अपंगत्व असलेल्या मुलांना प्रशिक्षित करतो. या पार्श्वभूमीवर आधारित ही कथा हलकीफुलकी विनोदी असूनही मनाला भिडणारी आणि प्रेरणादायी आहे.


‘सितारे जमीन पर’चा ट्रेलर आनंद, आत्मियता आणि प्रेरणा यांचा सुंदर संगम आहे. त्यात हास्य आणि भावनिक क्षण यांचा परिपूर्ण ताळमेळ साधण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आमिर खान प्रोडक्शन्स या चित्रपटाद्वारे १० नवोदित कलाकारांना लॉन्च करत आहे .अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर.


चित्रपटाचे दिग्दर्शन आर.एस. प्रसन्ना यांनी केले. चित्रपटाची निर्मिती ‘आमिर खान प्रोडक्शन्स’च्या बॅनरखाली झाली आहे. ‘सितारे जमीन पर’ मध्ये आमिर खान आणि जेनेलिया देशमुख मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. संगीत दिग्दर्शन शंकर-एहसान-लॉय यांचे असून, गीतकार आहेत. अमिताभ भट्टाचार्य. पटकथा डिव्य निधी शर्मा यांनी लिहिली आहे. चित्रपटाचे निर्माते आहेत आमिर खान, अपर्णा पुरोहित आणि रवि भगचंदका हे आहे.


नागा चैतन्यने दिली ‘सितारे जमीन पर’च्या ट्रेलरला खास प्रतिक्रिया; म्हणाला...





आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटच्या ट्रेलरला मिळत आहे प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम, साऊथ सुपरस्टार नागा चैतन्य यांनी दिली खास प्रतिक्रिया. नागा चैतन्य यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले आहे – “हे शानदार दिसत आहे आमिर सर... मनाला भिडणारं! संपूर्ण टीमला माझ्या शुभेच्छा!”


मोदी - आमिर खान भावनिक संवाद


कॉन्क्लेव्हदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अभिनेता आमिर खान यांची भेट झाली. तेव्हा पंतप्रधानांनी आमिरला विचारले, ‘तुझी अम्मी कशी आहे?’ यावर आमिरने हसत उत्तर दिलं, ‘ती ठिक आहे सर.’ त्यावर पंतप्रधान म्हणाले, ‘आपली शेवटची भेट झाली होती तेव्हा तू सांगितलं होतंस की तिच्यावर पुन्हा उपचार सुरू झाले आहेत.’ आमिरने होकारार्थी मान हलवत उत्तर दिलं, ‘हो सर, पण आता ती पूर्णपणे बरी आहे.’ हा संवाद ऐकून उपस्थित भावूक झाले. पंतप्रधानांनी एका कलाकाराच्या आईच्या तब्येतीची पूर्वीच्या भेटीतून आठवण ठेवणं, ही गोष्ट त्यांच्या संवेदनशीलतेचं आणि मन:पूर्वक व्यक्तींना लक्षात ठेवण्याच्या वृत्तीचं प्रतीक ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अभिनेता आमिर खान यांच्यातील या भावनिक संवादाने वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा पसरली.





जेव्हा १० नवोदित कलाकारांनी पाहिला स्वतःचा पहिला ट्रेलर


चित्रपटात आमिर खानसोबत १० नवोदित कलाकार पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. जेव्हा या नव्या चेहऱ्यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत स्वतःचा पहिला ट्रेलर बघितला, तेव्हा तो क्षण हास्य, आनंदाश्रू आणि अपार प्रेमाने भारलेला होता – जणू एखादं स्वप्न प्रत्यक्षात साकार झालं.

हे सर्व नवोदित कलाकार आमिर खान प्रॉडक्शन्सच्या ऑफिसमध्ये एकत्र आले होते, जिथे त्यांनी पहिल्यांदा ट्रेलर पाहिला. त्यांच्या मेहनतीचं प्रतिबिंब पडद्यावर झळकताना पाहून, सगळं वातावरण जणू जादूने भरून गेलं. टाळ्यांचा कडकडाट, आनंदाश्रू, आणि प्रेरणादायी क्षणांनी त्या ऑफिसमध्ये एक अविस्मरणीय उत्सवाचं रूप धारण केलं. दिग्दर्शक आर.एस. प्रसन्ना यांनी त्या क्षणी जोशात एकच नारा दिला – "सितारेरेरेरे!" – आणि तो क्षण सर्वांच्या मनात कोरला गेला.

स्वतःच्या मुलांना पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहणं हे त्यांच्या पालकांसाठी एक स्वप्न साकारल्यासारखं होतं. त्यांच्या डोळ्यांत गर्व, आनंद आणि कृतज्ञतेचे अश्रू होते. सर्व पालकांनी आमिर खान आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानले. त्या क्षणी जे प्रेमळ आलिंगन, अश्रूंनी ओथंबलेली दृश्यं आणि हृदयस्पर्शी वातावरण तयार झालं, ते खरोखरच अमूल्य होतं.

Comments
Add Comment

‘दशावतार’ची छप्पर फाड कमाई !

मुंबई : सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात उत्तम कामे केली. या चित्रपटाने सहाव्या

कपिल शोच्या ग्रँड फिनालेत अक्षय कुमारचा जलवा !

मुंबई : ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या तिसऱ्या सीझनचा समारोप अतिशय धमाल आणि भावनिक क्षणांनी झाला . या भागाचे

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 'जॉली एलएलबी ३' च्या निर्मात्याला दिलासा !

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाविरोधात दाखल

पीएम मोदी बायोपिकची घोषणा

साऊथ स्टार उन्नी मुकुंदन होणार 'पंतप्रधान' मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आणखी एक बायोपिक

Dashavtar Box Office Collection: दशावतारच्या कमाईत होतेय जबरदस्त वाढ, कमावले तब्बल इतके कोटी...

मुंबई: बॉलिवूडपासून ते दाक्षिणात्य सिनेमांपर्यंत सर्वांवर सध्या मराठी सिनेमा दशावतार भारी पडत आहे. दिवसेंदिवस

अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर

मुंबई: अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये