
चंद्रपूर : ताडोबाच्या बफर मधील चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी ८.३० वाजता समोर आली.

बुलढाणा : देवदर्शनासाठी गेलेल्या एका कुटुंबाचा परतीच्या प्रवासात चिरडून मृत्यू झाला. महाकालचे दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या नांदेडच्या पवार कुटुंबाची ...
तेंदुपत्ता तोडण्यासाठी जात आहे. करबडा येथील कचराबाई अरुण भरडे (५४) ही महिला आपल्या पती सोबत गावाशेजारील जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेली होती. पळसगाव वनपरीक्षेत्रामधील देवरीकर करबडा येथील कक्ष क्रमांक ८६२ मध्ये तेंदुपत्ता तोडत असताना झुडपात बसलेल्या वाघाने अचानक महिलेवर हल्ला केला, तेव्हा महिला ओरडली. ओरडण्याच्या आवाजाने घटना पतीच्या लक्षात आली. पतीने बघितले, तेव्हा वाघ त्या महिलेला तोंडात पकडून फरफटत नेत असताना दिसून आले. लगेच त्याने गावकऱ्यांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने दाखल झाले. कचराबाईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला.