Wednesday, May 14, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

कसोटीसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार; इशान किशनला लागली लॉटरी

कसोटीसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार; इशान किशनला लागली लॉटरी

नवी दिल्ली : भारत २० जूनपासून इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामने खेळणार आहे. मुख्य दौऱ्यापूर्वी, भारत अ संघ दोन सामन्यांसाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे. इंग्लंड लायन्सविरुद्धच्या पहिल्या अनधिकृत कसोटीसाठी भारत अ संघात यशस्वी जयस्वाल आणि इशान किशन हे दोन मुख्य नावे असतील.


अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील बीसीसीआय निवड समिती भारत अ संघाच्या पहिल्या सामन्यासाठी १४ सदस्यीय संघ निवडेल, ज्यामध्ये असे खेळाडू असतील ज्यांचे संघ आयपीएल २०२५ च्या प्लेऑफ टप्प्यासाठी पात्र ठरणार नाहीत. या सामन्यासाठी सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि विकेटकीपर फलंदाज इशान किशन या दोघांचा १४ खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. इशान किशन याआधी संघात नव्हता. मात्र आयपीएलमध्ये २ खेळाडूंना झालेल्या दुखापतीमुळे इशानची दौऱ्यासाठी वर्णी लागली आहे.


आयपीएलच्या १८ व्या मोसमातील सुधारित वेळापत्रकामुळे फक्त एकाच सामन्यासाठी संघ निवडण्यात आला आहे. सुधारित वेळापत्रकामुळे एकाच वेळेस प्लेऑफ आणि इंडिया ए विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्यात एकाच वेळेस सामने होत आहेत.


पहिल्या अनधिकृत कसोटीनंतर शुभमन गिल, साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर या त्रिकुटाला दुसऱ्या सामन्यासाठी पाठवण्याची तयारी असल्याचे म्हटले जात आहे. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार आणि देवदत्त पडीक्कल या दोघांना झालेल्या दुखापतीमुळे इशानला लॉटरी लागली असल्याचे म्हटले जात आहे.

Comments
Add Comment