Wednesday, May 14, 2025

मनोरंजनताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजविडिओ

Ind VS Pak : भारत-पाक युद्धाचा मनोरंजन विश्वावर काय झाला परिणाम?

Ind VS Pak : भारत-पाक युद्धाचा मनोरंजन विश्वावर काय झाला परिणाम?

भारत - पाकिस्तान युद्धाचा आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रांवरच परिणाम झाला नाही तर मनोरंजन क्षेत्रही भरडलं गेलंय. अनेक सिनेमांचं प्रदर्शन रद्द झालंय. कलाकारांचे दौरे पुढे ढकलले गेलेत. भारत - पाकिस्तान युद्धाचा नेमका काय परिणाम झाला आहे ते जाणून घेऊया.


पहलगाम दहशतवाही हल्ल्याचा बदला भारताने ऑपरेशन सिंदूर मोहिमेद्वारे घेतला. त्यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने भारताविरुद्ध कुरापतींना सुरुवात केली. याचा फटका मनोरंजन क्षेत्र आणि विमान सेवांना बसला. कलाकार आणि चित्रपट प्रदर्शनावरही भारत - पाक तणावाचे परिणाम जाणवले. कोट्यवधींची उलाढाल थांबलीय.


?si=CzXL-jXqxxIYm-KB

कमल हसन यांच्या ठग लाईफ या चित्रपटाचा ऑडिओ लॉन्च १६ मे रोजी होणार होता तर राजकुमार राव आणि वामिका गब्बीचा भूल चकू माफ सिनेमा ९ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. कमल हसन यांचा ठग लाईफ हा ऑडिओ लॉन्च चेन्नईच्या इनडोअर स्टेडिययमध्ये होणार होता, मात्र देशासाठी जवान सीमेवर लढत असताना असा इव्हेंट करणं योग्य नसल्याचे सांगत तो रद्द करण्यात आला. तर भूल चूक माफ हा सिनेमा आता १६ मे रोजी ओटीटीवर रिलीज होणार आहे.



भारत - पाकिस्तान तणाव वाढल्याने फवाद खानच्या अबीर गुलाल या चित्रपटाचंही प्रदर्शन लांबवण्यात आलंय. तर दुसरीकडे गायिका उषा उत्थुप यांचा कॉन्सर्ट रद्द करण्यात आलाय.पहलगाम हल्ल्यानंतर अरिजीत सिंगचा कॉन्सर्टही रद्द करण्यात आलाय. हा शो चेन्नईत होणार होता. त्याचबरोबर अबूधाबीमध्ये होणारा इव्हेंटही रद्द करण्यात आलाय. एकूणच भारत - पाकिस्तान युद्धाचा मोठा फटका मनोरंजन क्षेत्रालाही बसलाय. आता युद्धविराम झालाय. त्यामुळे काही दिवसांनी या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाईल, एवढं निश्चित.

Comments
Add Comment