
?si=SyP_o4pciX-HwJVk
पावसाळ्यात दम्याचा त्रास जास्त संभवतो. त्यामागे हवेतील आर्द्रता, वातावरणातील अचानक बदल, घराच्या भिंतीला ओल आणि त्यामध्ये निर्माण होणारे मोल्ड किंवा बुरशी ही त्याची कारणं आहेत. या संपर्कातून सतत खोकला, छातीवर दाब, श्वास घेताना होणारा त्रास-घरघर अशी काही लक्षणे दिसतात. अस्थमा किंवा दमा हा श्वासनलिकेचा आजार आहे . हा ५-६ टक्के लोकांमध्ये आढळतो. लहान मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त आढळतं. पावसाळ्यात अस्थमा म्हणजेच दम्याचा अटॅक येण्याची शक्यता अधिक असते.
आता अस्थम्याचे प्रकार व कारणे काय ? ते पाहू
काही रुग्णांचा दमा हा वंश परंपरागत असतो किंवा काही रुग्णांना अचानकच उतारवयात सुद्धा जाणवतो. कधी दमा फक्त ऋतूप्रमाणे असतो तर कधी बाराही महिने. वाढणारे वजन आणि ओबेसीटी हे सुद्धा दम्याचे एक कारण असू शकते, असे आरोग्य तज्ञ सांगतात. धूळ, परागकण यांची एलर्जी, बदलती जीवनशैली, धकाधकीचं जीवन, अपुरी झोप ही दम्याची काही कारणं सांगता येतील.

Child Holiday Activities : सुटीत मुलं घरी आहेत... त्यांचा कंटाळा घालवायचायं? मग या गोष्टी करा फॉलो
सध्या उन्हाळा सुरू आहे. शाळांनाही सुट्या लागल्यात. उन्हाळी सुट्यांमध्ये मुलांना मौजमज्जा करायला, मुक्त हुंदडायला खूप आवडतं. पण बाहेर ऊन असल्यानं ...
दम्याच्या त्रासपासून बचावासाठी काळजी काय घ्याल?
१. घराबाहेर मास्कचा वापर करावा.
२. बाहेरचे खाणे टाळावे.
३. फ्लू लसीकरण जरूर करून घ्यावे.
४. घरातील भिंतीवर असलेली ओल आणि बुरशी काढण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे.
५. हवेतील आर्द्रता जास्त असल्यास रूम हीटरचा वापर करता येईल.
सर्वप्रथम दम्याच्या रुग्णांचा शत्रू म्हणजे अॅलर्जी. अलर्जी शोधल्यावर त्यापासून दूर करण्यासाठी जीवनशैली बदलायची गरज असते. इनहेलर थेरपी हीच दम्यासाठी प्राथमिक उपचार पद्धती आहे आणि ते योग्य पद्धतीने वापरणे आवश्यक आहे. दमा उपचारासाठी फुफ्फुसविकारतज्ज्ञ यांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.