Wednesday, May 14, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

मध्य रेल्वेवर आज आणि उद्या रात्री विशेष पॉवर ब्लॉक!

मध्य रेल्वेवर आज आणि उद्या रात्री विशेष पॉवर ब्लॉक!

गर्डर उतरवण्यासाठी मध्य रेल्वेवर आज, उद्या रात्री कांजूरमार्ग- मुलुंड दरम्यान विशेष पॉवर ब्लॉक


मुंबई : मध्य रेल्वे बुधवारी आणि गुरुवारी मध्यरात्री कांजुर मार्ग येथे पाइपलाइन गर्डर उतरवण्यासाठी कांजुर मार्ग-मुलुंड विभागात विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेणार आहे.


कांजुर मार्ग पाईपलाईन पुलाचे गर्डर रोड क्रेनद्वारे उतरवण्यासाठी कांजुर मार्ग आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर; अप आणि डाऊन जलद मार्गावर आणि पाचव्या मार्गावर हा विशेष वाहतूक पॉवर ब्लॉक असेल.



ब्लॉकचे तपशील खालीलप्रमाणे


ब्लॉक १ - बुधवारी रात्री ०१:१५ ते ०३:१५ वाजेपर्यंत २ तासांसाठी हा पॉवर ब्लॉक असेल.


ब्लॉक २ - गुरुवार रात्री घेण्यात येईल. हा ब्लॉक १:१५ वाजता ते ३:१५ वाजेपर्यंत २ तास असेल.


या दोन्ही रात्री या ब्लॉक दरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गिका अप आणि डाउन जलद मार्गिका आणि ५व्या आणि ६व्या मार्गिकवर असेल. या ब्लॉक काळात कांजूर मार्ग आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाउन स्लो मार्गावरील सेवा; अप आणि डाउन फास्ट मार्गावरील सेवा आणि पाचव्या आणि सहाव्या मार्गावरील सेवा रद्द केल्या जातील.



या दोन्ही दिवशी रात्री खालील उपनगरीय गाड्या रद्द राहतील.


१. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२४ वाजता सुटणारी ठाणे लोकल रद्द राहणार.


२. ठाणे येथून ०४.०४ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल रद्द राहणार.

Comments
Add Comment