
मुंबई : मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसाठी कोट्यवधी रुपये खर्च होतात, मोठमोठे दावे केले जातात. पण प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे, हे दाखवण्यासाठी मनसेने आज साकिनाक्यात नाल्यात उतरून एक आगळंवेगळं आंदोलन केलं!
साकिनाका परिसरातील एका नाल्यात इतका कचरा जमा झाला आहे की, मनसेचे कार्यकर्ते चक्क त्या नाल्यात उभं राहून व्हॉलीबॉल खेळले! हा प्रकार पाहणाऱ्यांना धक्का देणारा होता. हे आंदोलन मनसेचे चांदिवली विधानसभा अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं.
“महानगरपालिका फक्त मोठ्या नाल्यांची सफाई करते. लहान नाल्यांकडे मात्र दुर्लक्ष होतंय. अधिकारी जबाबदारी झटकत एकमेकांकडे बोट दाखवतायत. त्यामुळे आम्हालाच नाल्यात उतरावं लागलं,” असं भानुशाली यांनी सांगितलं.

१५ ठिकाणी दरड कोसळण्याचे संकट! विरार : रायगडच्या इर्शाळवाडीतील भीषण दरड दुर्घटनेचं सावट आता वसई-विरारवर घोंगावतंय. महापालिकेच्या अधिकृत यादीनुसार ...
ते पुढे म्हणाले, जर लवकरच या नाल्याची योग्य सफाई झाली नाही, तर या नाल्यातील सगळा कचरा उचलून एल वॉर्ड कार्यालयात नेऊन टाकू. दुसरा पर्यायच उरणार नाही, असा इशारा महेंद्र भानुशाली यांनी दिला आहे.
या आंदोलनामुळे नालेसफाईचा गाजावाजा आणि प्रत्यक्ष कामातील गैरकारभार पुन्हा समोर आले आहे. पावसाच्या आधी तरी प्रशासनाला जाग येणार का? की यंदाही मुंबईकरांनी पूर, दुर्गंधी आणि रोगराईला सामोरं जावं लागणार? असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.