Microsoft कंपनीने ७,००० कर्मचाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता! पण का?

  131

नवी दिल्ली : सतत बदलत्या टेक्नॉलॉजीच्या स्पर्धेत टिकण्यासाठी जगातील दिग्गज आयटी कंपनी Microsoft ने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. Microsoft कंपनीने ३ टक्के जागतिक कर्मचारी कपात जाहीर केली आहे, ज्यामुळे सुमारे ७,००० कर्मचाऱ्यांना काम गमवावं लागणार आहे. ही कंपनीच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कपात मानली जाते.



कपात का केली गेली?


Microsoft चा हा निर्णय केवळ खर्चकपात किंवा कामगिरीवर आधारित नसून, संरचनात्मक पातळीवर बदल घडवून आणण्याचा भाग आहे. कंपनी आता अधिक 'फ्लॅट' म्हणजे सुलभ आणि कार्यक्षम रचना तयार करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. याचा अर्थ, मॅनेजमेंटची पातळी कमी करून प्रत्येक मॅनेजरकडे अधिक कर्मचाऱ्यांचं नियंत्रण देणं, म्हणजेच अधिक जबाबदारी देणं, असा प्रयत्न सुरु आहे.



कसल्या भूमिका धोक्यात?


या कपातीत विशेषतः मिडल मॅनेजमेंट पदांवर कार्यरत कर्मचाऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. कारण कंपनी AI तंत्रज्ञानात प्राधान्याने गुंतवणूक करत आहे. त्यामुळे इंजिनिअरिंग व तांत्रिक कुशलतेला अधिक महत्त्व दिलं जात आहे.



नवीन कार्यपद्धती आणि नियम



  • कामावरून कमी केले गेलेल्या कर्मचाऱ्यांना ६० दिवसांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

  • काही कर्मचाऱ्यांना 'परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट प्लान' (PIP) मध्ये सामील होण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

  • फक्त पाच दिवसांच्या आत निर्णय घ्यावा लागणार असून, एकदा PIP स्वीकारल्यास सेव्हरन्स पॅकेज (१६ आठवड्यांचा पगार) मिळणार नाही.

  • कामगिरीवरून कमी झालेल्या कर्मचाऱ्यांना २ वर्षांपर्यंत पुन्हा भरतीवर बंदी घालण्यात आली आहे.


याशिवाय Microsoft ने 'गुड अ‍ॅट्रिशन' नावाची नवीन संकल्पना सुरू केली आहे, ज्याद्वारे "स्वतःहून दिलेला राजीनामा जर कंपनीसाठी फायद्याचा असेल तर तो स्वागतार्ह मानला जाईल", असा स्पष्ट संकेत देण्यात आला आहे.



टेक इंडस्ट्रीतील मोठा ट्रेंड


Microsoft चा हा निर्णय वेगळा नाही. Amazon, Google आणि Meta यांसारख्या इतर तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांनीही आपल्या संघटनांमध्ये "फ्लॅट स्ट्रक्चर" स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. Meta चे CEO मार्क झुकरबर्ग यांनी तर २०२४ हे "कार्यक्षमतेचं वर्ष" म्हणून जाहीर केलं आहे.



चांगले आर्थिक निकाल असूनही कपात का?


Microsoft ने एप्रिल महिन्यात उत्तम तिमाही निकाल सादर केले होते. मात्र, AI व्यतिरिक्त Azure क्लाउड सेवेतील वाढ अपेक्षेपेक्षा कमी असल्यामुळे CEO सत्या नडेला यांनी विक्री कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचे संकेत दिले होते.



Microsoft कंपनीचा 'फोकस' बदलतोय


Microsoft ने ७,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची घोषणा करून पुन्हा एकदा संकेत दिला आहे की, कंपनी आता पूर्ण ताकदीने कृत्रिम बुद्धिमत्तेकडे (AI) वाटचाल करत आहे. एकीकडे नोकरकपात, तर दुसरीकडे AI मध्ये अब्जावधींची गुंतवणूक – Microsoft चा हा 'स्ट्रॅटेजिक पिव्होट' लक्षवेधी ठरत आहे.



नोकरकपात म्हणजे AI मुळे नोकऱ्या गेल्या का?


या निर्णयामुळे अनेकांनी अंदाज बांधला की AI मुळे मनुष्यबळाची गरज कमी झाली आणि त्यामुळे ही कपात झाली. मात्र Microsoft च्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे संपूर्णपणे तसंच नाही.


कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही नोकरकपात म्हणजे 'स्ट्रक्चरल ऑप्टिमायझेशन' आहे. ज्यामुळे AI मध्ये अधिक गुंतवणूक करता येईल आणि कंपनीची एकूण आर्थिक कार्यक्षमता वाढेल.



AI म्हणजे Microsoft ची नवी ओळख


CEO सत्या नडेला यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात सांगितलं की, "आज Microsoft च्या काही प्रोजेक्ट्समधील २० ते ३० टक्के कोड हे पूर्णपणे AI ने लिहलेलं असू शकतं."


नडेला यांनी Microsoft ला "AI डिस्टिलेशन फॅक्टरी" बनवण्याचा विहंगम दृष्टिकोन मांडला आहे – जिथे मोठ्या AI मॉडेल्सना संकुचित करून विशिष्ट कामांसाठी योग्य मॉडेल्समध्ये रुपांतर केलं जातंय.



AI कुठे वापरतोय Microsoft?



  • Microsoft च्या प्रमुख उत्पादनांमध्ये

  • Microsoft 365 (Word, Excel, Outlook)

  • Azure Cloud Platform

  • Dynamics365


यांमध्ये आता AI क्षमतांचा अधिकाधिक समावेश होत आहे. यामुळे उद्योग क्षेत्रासाठी AI-चालित सोल्युशन्स तयार केली जात आहेत.



AI मध्ये किती गुंतवणूक?


सत्या नडेला यांच्या मते, Microsoft २०२५ आर्थिक वर्षात AI वर तब्बल ८० अब्ज डॉलर्स खर्च करणार आहे. हे प्रमाण कंपनीच्या आर्थिक आकड्यांवरूनही स्पष्ट होतं. नुकतीच कंपनीने ७०.०७ अब्ज डॉलर्स इतकं तिमाही उत्पन्न नोंदवलं, जे वॉल स्ट्रीटच्या अपेक्षेपेक्षा अधिक आहे.


Microsoft चे शेअर्स ४४९.२६ पर्यंत पोहोचले, जे या वर्षातील उच्चांकी दर आहे. (जुलै २०२४ मध्ये विक्रमी ४६७.५६ दर होता)



गुंतवणूकदारांसाठी काय संकेत?


Microsoft ची ही वाटचाल म्हणजे AI ही केवळ 'फॅड' नाही, तर दीर्घकालीन धोरणाचा भाग आहे. AI मध्ये जो कोणी प्रगती करेल, त्याच्याकडे बाजाराचं नेतृत्व जाईल आणि Microsoft सध्या या शर्यतीत आघाडीवर आहे.

Comments
Add Comment

भूकंपानंतर आता रशियात ज्वालामुखीचा उद्रेक! राखेचे लोट ६,००० मीटर उंचीपर्यंत

मॉस्को: रशियाच्या कामचटका प्रांतातील Petropavlovsk येथे ८.८ तिव्रतेचा भीषण भूकंप झाल्यानंतर आता याच ठिकाणी ज्वालामुखीचा

शिंदेंनी शिवसेना का सोडली ? मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा

मुंबई : विधान परिषदेच्या २०२२ च्या निवडणुकीनंतर शिवसेनेत दोन गट झाले. हे असे का झाले एकनाथ शिंदे पक्ष नेत्यांशी न

मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट जमिनीवर कोसळली

बीड : मराठा नेते मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्य होते त्या लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट जमिनीवर धाडकन कोसळली. मनोज

युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ

'हिंदूंना बदनाम करण्याचा काही राजकारण्यांचा कट'

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांच्या निवडक नेत्यांनी हिंदूंना बदनाम

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची