Wednesday, May 14, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

मध्य प्रदेशच्या मंत्र्यावर न्यायालयाचे आदेशानंतर गुन्हा दाखल; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य अंगलट

मध्य प्रदेशच्या मंत्र्यावर न्यायालयाचे आदेशानंतर गुन्हा दाखल; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य अंगलट

भोपाळ : कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त करणारे भाजपा मंत्री विजय शाह अडचणीत सापडले आहेत. मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं विजय शाह यांच्या वक्तव्याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. विजय शाह यांच्यावर पुढील चार तासात एफआयआर करण्यात यावी, असे निर्देश मध्य प्रदेशच्या डीजीपींना दिले आहेत. न्यायालयीन आदेशानंतर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे.


भाजपा मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. ‘त्यांनी आपल्या मुलींचे कुंकू पुसले होते, त्या लोकांना आम्ही त्यांच्याच बहिणीला पाठवून चांगलाच धडा शिकवला. त्यांनी आमच्या हिंदूंना कपडे काढून मारले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याच समाजातील बहिणीला पाठवले की, जेणेकरुन ज्यांनी आमच्या बहिणी विधवा केल्या, त्यांना त्यांच्या समाजातील बहीण नग्न करुन सोडेल’, असे विजय शाह म्हणाले होते.



विजय शाह यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस आक्रमक


भाजप मंत्री विजय शाह यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उमटत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांच्यासह काँग्रेसचे शिष्टमंडळ श्यामला हिल्स पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. काँग्रेसने विजय शाह यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी केली. श्यामला हिल्स पोलीस ठाण्यामध्ये यासंदर्भातील निवेदन दिले आहे. काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री मोहन यादव यांना पत्र लिहिले आहे.



विजय शाह यांचा माफीनामा


सोफिया कुरेश यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर मंत्री विजय शाह यांनी माफी मागितली आहे. मी दहावेळा माफी मागण्यास तयार आहे. माझ्याकडून चुकून अपशब्द निघाले, असे विजय शाह म्हणाले. माझे संपूर्ण कुटुंब, कुळ लष्करी आहे. माझ्या कुटुंबातील अनेक लोक कारगिल आणि इतर ठिकाणी शहीद झाले, असेही विजय शाह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Comments
Add Comment