
सध्या उन्हाळा सुरू आहे. शाळांनाही सुट्या लागल्यात. उन्हाळी सुट्यांमध्ये मुलांना मौजमज्जा करायला, मुक्त हुंदडायला खूप आवडतं. पण बाहेर ऊन असल्यानं काळजी म्हणून पालक त्यांना बाहेर जाऊ देत नाहीत. घरी थांबले की मुलं टीव्ही पुढं बसतात. मोबाईल, कम्प्युटरवरील गेममध्ये रमतात. सध्याच्या मोबाईलच्या जमान्यात त्यांना पारंपरिक खेळ खेळायला प्रोत्साहित करणं म्हणजे पालकांची परीक्षाच असते. त्यांना मोबाईलपासून दूर ठेवलं आणि त्यांना करमेनास झाल की ते आईच्या मागे भूणभूण लावतात. लहाग्यांना मोबाईलपासून दूर ठेवत त्यांचा कंटाळा घालवणं... घरात इतर अँक्टिव्हिटीमध्ये सतत गुंतवणं आवश्यक आहे. पण ते कसं? सध्या तुम्हांलाही हा प्रश्न पडतो ना? मग जाणून घेऊया या लेखातून
?si=bcekPx7tZtAXii2X
घरात लहान मुलं असली की त्यांचे मन सतत रमवावे लागतं. त्यांना कंटाळाही फार लवकर येतो. सतत काही ना काही नवीन करावं वाटत असतं. पण त्यांना कशात तरी गुंतवून ठेवावे. त्यांची करमणूक करणं म्हणजे मोठ कठीण काम वाटतं. जेव्हा आपल्याला घरातली किंवा बाहेरची काही कामं पार पाडायची असतात तेव्हा मुलांचा कंटाळा घालवणं हे आई वडिलासमोरचं मोठं आव्हान असतं. लहान मुलांमध्ये खूप ऊर्जा असते, त्यांना सतत कुठेतरी गुंतवून ठेवावं लागतं. त्यासाठी तुम्ही त्यांना टी. व्ही. समोर बसवून ठेवलं आणि आपलं काम झालं. असं करता येत नाही. या लेखातून पाहूया...पालक म्हणून इतर काम असतात. त्यासाठी आपल्यालाही वेळ मिळायला हवा. थोडी शांतता मिळावी. यासाठी आपण कसं नियोजन करायला हवं ते...

भारत - पाकिस्तान युद्धाचा आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रांवरच परिणाम झाला नाही तर मनोरंजन क्षेत्रही भरडलं गेलंय. अनेक सिनेमांचं प्रदर्शन रद्द झालंय. ...
१. मुलांचा दिनक्रम मजेशीर करा..म्हणजे मुलं करमत नसल्याची तक्रार करणार नाहीत.
२ सकाळी कोण लवकर आणि पटकन झोपेतून उठेल आणि पटापट तयार होईल ते पाहूया... अशी वेळेची स्पर्धा लावा.
३. रोजची कामे किंवा घरातली छोटी छोटी कामे करताना गाणी ऐकून नृत्य करायला सांगा..
४. मुलांना कोणते कपडे घालावेत आणि नाचतात काय हवा, हे निवडीचं स्वातंत्र्य द्या.
५. छोट्या छोट्या कामाची विभागणी करा. काही गोष्टी करणं मुलांना अजिबातच आवडत नाही. अशा वेळी एखादा भाग झाला की बक्षीस मिळेल, असे सांगा. मुलं काम आनंदाने करतील.
६. मुलांनी एक काम फत्ते केलं की त्यांना गोड खाऊ द्या.
७. तीन गोष्टी केल्या तर संध्याकाळी बागेत फिरायला घेऊन जा, पाच कामे केल्यास तासभर खेळायला परवानगी द्या.
वरील गोष्टी अंमलात आणल्या तर मुलांची सुटी मजेत जाईल आणि पालकांनाही इतर कामासाठी वेळ मिळेल.