Wednesday, May 14, 2025

मनोरंजनमजेत मस्त तंदुरुस्त

Mango: आंबा खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते का ?

Mango: आंबा खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते का ?

मुंबई: आंबा, त्यातच हापूस आंबा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. आंबा पाहिला की त्याचा आस्वाद घ्यावासा वाटतो. मात्र आजकाल मधुमेही रुग्णांमध्ये वाढ होतेय. आंबा खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते का ? आंबा जेवणापूर्वी खावा की जेवल्यानंतर खावा, पाहूयात


सध्या आंब्याचा सीझन आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आंबे बाजारात विक्रीसाठी उपल्बध आहेत. कोकणातून हापूस आंबेही पाठवले जात आहेत. मात्र आंबा गोड असल्याने तो खाल्ल्यास शरीरातील साखर वाढते का, असा प्रश्न अनेकांना पडलाय. त्यातच मधुमेहींना हा प्रश्न जास्त पडलाय.


खरं तर आंब्यात साखर असते ती नैसर्गिक स्वरुपाची. त्यामुळे आंबा खाल्ल्याने आंब्यातील नैसर्गिक साखर ही शरीराला पोषक घटक पुरवते. यामध्ये मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचा समावेश आहे. त्यामुळे आहारात आंब्याचा समावेश करता येऊ शकतो.


http://prahaar.in/2025/05/14/attack-on-kirana-hills-after-indias-operation-sindoor-mysterious-confusion-over-nuclear-energy-in-pakistan/

 

आंब्याचा आहारात समावेश केला, तरी त्याचं प्रमाण योग्य असावं. आपल्या रक्तातील साखर किती आहे हे लक्षात घेऊन आंबा खावा. रक्तातील साखरेचं प्रमाम जास्त असेल तर एक-दोन आंबे खाण्याऐवजी आंब्याचे एकाद दुसरं काप खावं. आंबा कितीही आवडीचा असला तरी उपाशीपोटी खाणं टाळावा. कारण आंब्यात असलेली नैसिर्गिक साखर रक्तातील साखर वाढवण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे नाश्त्यावेळी आंबा खाण्याची इच्छा झाली तर त्याबरोबर अन्य काही पदार्थांचा समावेश करावा. जेवण केल्यानंतर आंबा खाल्ल्यास कॅलरीजही वाढू शकतात.


आंब्यापेक्षा कैरी खाल्ल्यास जास्त उपयुक्त ठरू शकतं. कैरीमुळे रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रित राहू शकते. आहारात कैरीच्या पन्ह्याचा आवर्जून वापर करा. काहीही असो कोणतीही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. त्यामुळे आंब्याचा आस्वाद जरुर घ्या, मात्र शरीरातील साखर सांभाळा.






 










View this post on Instagram























 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)




Comments
Add Comment