Wednesday, May 14, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या ‘शक्ती’ चक्रीवादळाचे किनारपट्टीवर संकट

बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या ‘शक्ती’ चक्रीवादळाचे किनारपट्टीवर संकट

अंदमान समुद्र, निकोबार बेटांसह भारतातील विविध राज्यांना बसणार तडाखा


मुंबई : पावसाळा सुरु होण्यापूर्वीच भारतावर नव्या संकटाचे सावट निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात एक नवीन वादळ तयार होत आहे. भारतात तीव्र उष्णतेमध्ये समुद्राची हालचाल वाढल्याने देशात आणखी एक चक्रीवादळ धडकणार आहे. याला ‘शक्ती’ असे नाव देण्यात आले आहे. ते दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे, बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात पोहोचले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २३ ते २८ मे दरम्यान ते चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते. याचा परिणाम अंदमान समुद्र, निकोबार बेटांसह भारतातील विविध राज्यांवर होऊ शकतो.


हवामानशास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हवामान खात्याच्या अंदाजानुसार हे चक्रीवादळ २४ ते २६ मे दरम्यान किनाऱ्यावर आदळू शकते, यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. याबाबत हवामान विभागाने आधीच लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.



या राज्यांना सर्वाधिक धोका


आयएमडीच्या निवेदनानुसार, १४ मे २०२५ रोजी ३ वाजता, तमिळनाडूच्या किनाऱ्यापासून नैऋत्य बंगालच्या उपसागरावर समुद्रसपाटीपासून १.५ किमी उंचीवर एक वरच्या हवेतील चक्राकार वारा तयार झाला आहे. १६ आणि १७ मे रोजी नैऋत्य मान्सून दक्षिण अरबी समुद्र, मालदीव आणि कोकण क्षेत्र, बंगालच्या उपसागराचा काही भाग आणि संपूर्ण अंदमान आणि निकोबार बेटांवर पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. जर हे चक्रीवादळ आले तर त्याचा परिणाम ओडिशापासून बंगालपर्यंत दिसून येईल. शक्ती चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका ओडिशा, बंगाल आणि बांगलादेशातील किनारी भागावर होऊ शकतो. हे चक्रीवादळ बंगालच्या किनारी भागातून बांगलादेशातील खुलना येथे पोहोचू शकते. आयएमडीने या भागांसाठी ‘येलो’ इशारा जारी केला आहे आणि रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पूर्व-मध्य आणि दक्षिण अरबी समुद्र, लक्षद्वीप बेटे क्षेत्र, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्रात ढगदाळ वातावरणाची शक्यता आहे.



समुद्रात न जाण्याचे आवाहन


भारतीय हवामान विभागानुसार, या महिन्यात तीन दिवस कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यापैकी एकाचे चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते. त्यामुळे किनारी भागात मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि वादळासारखी परिस्थिती निर्माण होईल. सरकारने स्थानिक प्रशासनाला याबाबत सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. हवामान विभागाने किनारी भागातील रहिवाशांना समुद्रात न जाण्याचे व सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment