
पुण्यापाठोपाठ उदयपूरही मैदानात!
दिल्ली/पुणे/उदयपूर : पाकिस्तानला शस्त्रास्त्रे आणि ड्रोन पुरवणा-या तुर्कीविरोधात भारतभर संतापाची लाट उसळली आहे. ‘बॉयकॉट तुर्की’ हे अभियान आता केवळ सामाजिक माध्यमांपुरते राहिले नसून प्रत्यक्ष व्यापार क्षेत्रातही त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. पुण्यानंतर आता उदयपूरच्या मार्बल व्यापा-यांनीही तुर्कीशी व्यापार तोडण्याचा निर्णय घेतला आहे.
तुर्कीचा विश्वासघात
भारतावर झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर तुर्कीने पाकिस्तानला मदतीचा हात देत, लष्करी विमाने भरून ड्रोन आणि शस्त्रास्त्रे पाठवली होती. याउलट जेव्हा तुर्कीत महाभयंकर भूकंप झाला होता, तेव्हा भारताने सर्वात मोठा मदतीचा हात पुढे केला होता. मात्र तुर्कीने भारताचे उपकार विसरून पाकिस्तानला पाठिंबा देत भारताच्या पाठीत खंजीर खुपसल्याची भावना आता जनतेत प्रबळ झाली आहे.
पुण्यातून सुरू झालेला बहिष्कार
पुण्याच्या व्यापा-यांनी तुर्कीमधून आयात होणारे सफरचंद आणणे थांबवले आहे. त्यामुळे बाजारात या सफरचंदांचा तुटवडा जाणवतो आहे. आधी ग्राहकांना याची माहिती नव्हती की काही सफरचंद तुर्कीतून येतात, मात्र आता ती जाणीव वाढली आहे. पुण्यात दरवर्षी १००० ते १२०० कोटींची सफरचंदांची उलाढाल होते. सध्या या व्यापारात मोठी घट झाली असून, व्यापा-यांनी तुर्कीऐवजी इराण, हिमाचल आणि उत्तराखंडमधून माल मागवण्यास सुरुवात केली आहे.

पुणे : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिल्याने देशभरातून त्याला विरोध सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर ...
उदयपूरच्या मार्बल व्यापा-यांचा ठाम निर्णय
उदयपूरचे मार्बल व्यापारीही आता या मोहिमेत सामील झाले आहेत. “जोपर्यंत तुर्की पाकिस्तानला पाठिंबा देत आहे, तोपर्यंत आमचा कोणताही व्यापार तुर्कीशी होणार नाही,” असे दयापूर मार्बल प्रोसेसर्स कमिटीचे अध्यक्ष कपिल सुराणा यांनी जाहीर केलं आहे. भारतात आयात होणा-या संगमरवरीपैकी जवळपास ७० टक्के मार्बल तुर्कीमधून येतो. त्यामुळे उदयपूरच्या या निर्णयाचे जागतिक बाजारात मोठे पडसाद उमटू शकतात.
सुराणा पुढे म्हणाले की, “देशभरातील सर्व मार्बल उद्योगांनी जर तुर्कीविरोधात एकत्र निर्णय घेतला, तर तो जगाला भारताच्या ठाम भूमिकेचा संदेश देईल.”
तुर्कीच्या पाकिस्तानप्रेमामुळे भारतातील जनता आणि व्यापारी आता संयम गमावत असून, व्यवसायाच्या माध्यमातून तुर्कीला आर्थिक फटका देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

‘बॉयकॉट तुर्की’चा परिणाम वाढतोय – ट्रॅव्हल कंपन्यांपासून बाजारपेठांपर्यंत तुर्कीला भारतीयांचा दणका
तुर्कीने पाकिस्तानला समर्थन देत भारतविरोधी भूमिका घेतल्यानंतर देशभरात ‘बॉयकॉट तुर्की’चा सूर चढताना दिसतो आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला शस्त्रास्त्रांची मदत करणाऱ्या तुर्कीच्या भूमिकेमुळे भारतात संताप उसळला आहे. आता या रोषाचं प्रतिबिंब केवळ सोशल मीडियापुरतं नाही, तर प्रत्यक्ष व्यवहार आणि व्यापारावरही दिसू लागलं आहे. एक्स (पूर्वीचे ट्विटर)वर ‘#BoycottTurkey’ हा हॅशटॅग प्रचंड लोकप्रिय झाला आहे.
ट्रॅव्हल कंपन्यांचा तुर्कीवर बहिष्कार
Ixigo, EaseMyTrip यांसारख्या अनेक मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्हल कंपन्यांनी तुर्कीसाठीच्या फ्लाइट्स आणि हॉटेल बुकिंगवर थेट बंदी घातली आहे. EaseMyTrip ने अधिकृतपणे जाहीर केलं की, “भारतविरोधी भूमिकेमुळे तुर्कीच्या पर्यटनाला पाठबळ देणार नाही.” या निर्णयाचे व्यापारी जगतातही स्वागत झाले आहे.
आता मागणी ईराण, वॉशिंग्टन, न्यूझीलंडच्या सफरचंदांची
तुर्कीच्या सफरचंदांऐवजी आता भारतीय व्यापारी ईराण, वॉशिंग्टन आणि न्यूझीलंडमधील सफरचंदांना प्राधान्य देत आहेत. यामुळे ईराणच्या सफरचंदांचा १० किलोचा भाव २०० रुपये वाढून ३०० रुपयांवर गेला आहे. किरकोळ बाजारातही दर किलो भाव २०–३० रुपयांनी वाढले आहेत.
काश्मीरमधून होणाऱ्या पुरवठ्यावरही परिणाम
भारतातील घरगुती सफरचंद पुरवठा प्रामुख्याने काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंड मधून होतो. पण, यंदा पहलगाममधील तणावपूर्ण परिस्थिती आणि पावसामुळे वाहतूक अडचणीत आली, याचा परिणाम काश्मिरी सफरचंदांच्या उपलब्धतेवर झाला आहे. काश्मिरी सफरचंद साठवण्याची खास पद्धत असली तरी यावर्षी पुरवठा कमी भासत आहे.
तुर्कीमधून भारतात काय आयात होतं?
तुर्कीमधून भारतात दरवर्षी खनिज तेल, यंत्रसामग्री, बॉयलर्स, संगमरवरी, जिप्सम, अकार्बनिक रसायनं, मौल्यवान धातू व दगड, तसेच सफरचंद, चेरी, हेजलनट्स यांसारखे फळं आणि मेवे मोठ्या प्रमाणावर येतात. फक्त सफरचंदच नव्हे, तर तुर्कीच्या फळांवरही आता बहिष्कार लादला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यापारी वर्तुळात बोलली जात आहे.
‘बॉयकॉट तुर्की’ आता फक्त सोशल मीडियाचा ट्रेंड राहिलेला नाही, तर ती एक व्यापारी चळवळ बनत चालली आहे. भारताने उपकार केलेल्या देशाने भारताच्या विरोधात उभं राहिल्यानं, आता भारतीय जनतेनेच आर्थिक ताकदीने प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला आहे.