Wednesday, May 14, 2025

ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजLifestyle'ती'ची गोष्ट

Bangles Fashion : बँगल्सचाच धमाका! पारंपरिक लूक ते मॉडर्न ट्विस्ट!

Bangles Fashion : बँगल्सचाच धमाका! पारंपरिक लूक ते मॉडर्न ट्विस्ट!

हिंदू धर्मात बांगड्यांचे महत्त्व फार पूर्वीपासून सांगण्यात आले आहे. सणाच्या दिवशी बाजारात अनेक प्रकारच्या सर्वाधिक बांगड्या खरेदी केल्या जातात. पण आजकालचा बदलता ट्रेंड पाहता महिलांनीही सोन्याच्या बांगड्या न घालता आर्टिफिशिअल बांगड्या घालायला सुरुवात केली आहे. याचे कारण असे की तुम्ही तुमच्या आऊटफिटवर अगदी मॅच होणाऱ्या बांगड्या किंवा वेगवेगळ्या डिझाईन्सच्या बांगड्या घेऊन घालू शकतात. सणावाराच्या दिवसांमध्ये साडी किंवा ड्रेस परिधान केल्यानंतर महिला व मुली हातामध्ये सुंदर सुंदर बांगड्या घालतात. बांगड्या घातल्याने हाताचे सौंदर्य खुलून येते. ब्रेसलेट, आर्टिफिशिअल, चांदी, ऑक्सिडाइज्ड इतकंच काय तर आता लग्नसराईमध्ये नवरीसाठी ब्रायडल लटकन बँगल्ससुद्धा बाजारात उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला या लेखातून बँगल्सच्या नवनवीन डिझाइन्स सांगणार आहोत. ज्या तुम्ही सहजपणे साडी, ड्रेस, घागरा यावर घालू शकता.




१. पर्ल गोल्ड प्लेटेड बांगड्या


अतिशय सुंदर असे हे कडे ट्रेडीशन साडी किंवा ड्रेसवर घालु शकता. हे कडे लाल आणि हिरव्याचं रंगाचे असतात. यात गोल मोती असतात. हे दोन कडे तुमच्या हाताचं सौंदर्य नक्कीचं वाढवतील.



२. मोत्यांच्या बांगड्या


मोत्यांच्या बांगड्याचा सेट हा ट्रेडिशनल ड्रेसवर सुट होतो. हे असे ब्रेसलेट आहे जे अगदी बांगड्यांसारखे दिसतात. म्हणजे यामुळे बांगड्या घालायची गरज नाही. तुम्ही तुमच्या महागड्या आउटफिट्सवर या प्रकारच्या रॉयल बांगड्या कॅरी करू शकता. हे ब्रेसलेट दगड आणि रत्नांनी जडलेले आहे आणि त्याच्या कडांवर डिझायनर डिझाइन आहे. यामूळे त्यांनी हे आणखी सुंदर बनवते.



३. पारंपारिक बांगड्या


पारंपारिक अशा बांगड्या या कोणत्याही साडीवर शोभून दिसतात. साडीवर किंवा ट्रेडिशनल ड्रेसवर तुम्ही या बांगड्या घालू शकता.



४ सोनेरी जाळीदार तोडे


नववधू असो किंवा बाकी महिला मंडळी यांना प्रत्येक साडीवर सोनेरी जाळीदार तोडे हातात घालायला आवडतात. सोनेरी तोडे हमखास बाजारात अगदी स्वस्त दरात मिळून जातील. अशातच या तोंड्यांची स्टाईल ही कायमस्वरूपी महिलांची पहिली पसंद आहे. त्यामुळे या सोनेरी तोड्यांना मार्केटमध्ये खूप मागणी आहे. विशेष म्हणजे तोडे हातात घातल्यावर एक भरजरीत अनोखा लूक हातांना मिळतो.



५. हिरवा चुडा


महाराष्ट्रीयन लग्नातील दागिन्यांची फॅशन ही हिरव्या बांगड्यांशिवाय पूर्ण होत नाही. नवरीच्या हातात भरभरून हिरव्या बांगड्या घातल्या जातात आणि या बांगड्या घालण्याची परंपरागत रीतही आहे. हिरव्या बांगड्यांच्या मागे पुढे तोडे किंवा पारंपरिक कडे घालतात.



६. ऑक्सिडाइज्ड बांगड्या


आर्टिफिशिअल गोल्ड सोबतच ऑक्सिडाइज्डच्या बांगड्यासुद्धा ट्रेंडिंग आहेत. जर तुम्हाला तुमच्या हातांचे सौंदर्य वाढवायचे असेल तर तुम्ही या अशा घुंगरू बांगड्या घालू शकता. ऑक्सिडाइज्डमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाइन्स असतात जस की तोडे, घुंगरू, जाळी डिझाइन, स्टोन वर्क या बांगड्या हातामध्ये घातल्यानंतर खूप सुंदर दिसतात. तुमची साडी किंवा ड्रेस वेस्टर्न असेल तर ऑक्सिडाइज्डच्या ज्वेलरी सोबत या बांगड्या तुम्ही घालू शकता.



७. मखमली बांगड्या चुडा सेट


भारतातील अनेक संस्कृतींमध्ये, लग्नाच्या दिवसापासून सुमारे एक वर्षापर्यंत वधूला लाल, पिवळा, गुलाबी इत्यादी शुभ रंगांच्या बांगड्या घालण्याची परंपरा आहे. ही रचना चुडा सेटचे आकर्षण देते , ज्यामध्ये टोकांवर जड आरशाचे काम आणि मणी असलेल्या बांगड्या आणि मध्यभागी लाल मखमली बांगड्या असतात. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही बाजारपेठांमध्ये तुम्हाला असे बांगड्या सेट सहज सापडतात.



८. राजस्थानी चुडा


महिला आणि मुलींसाठी सुंदर मोर पितळी कडा असलेला राजस्थानी पारंपारिक वधू चुडा सेट नवरीसाठी उत्तम आहे. तुम्ही लग्न, उत्सव किंवा कोणत्याही घागऱ्यावर हा चुडा घालू शकता त्याच्यामध्ये तुमच्या आऊटफिटच्या रंगाच्या वेलवेट बांगड्या घालू शकता.

Comments
Add Comment