Tuesday, May 13, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Operation Sindoor : 'दहशतवादी आणि त्यांना मदत करणारा देश दोघांनाही धडा शिकवणार'

Operation Sindoor :  'दहशतवादी आणि त्यांना मदत करणारा देश दोघांनाही धडा शिकवणार'

नवी दिल्ली : भारत पाकिस्तान युद्धविरामानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी पाकिस्तानला सज्जड दम दिलाय. भारतीय सैन्याला स्वातंत्र्य दिलंय. त्यातच पाकिस्तान जर न्युक्लियर ब्लॅकमेलिंग करणार असेल तर भारत पाकिस्तानला धडा शिकवायला मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही दिलाय. भारताने दहशतवादीविरोधी कारवाईला स्थगिती दिलीय खरी, मात्र पाकिस्तानने पुन्हा आगळीक केली तर जशास तसा धडा शिकवण्याचा निर्धारही केलाय. माता भगिनींचे सिंदूर पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा नाशही केलाय. आणि शंभरहून अधिक दहशतवाद्यांना मारल्याचं पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलंय.


दहशतवाद्यांच्या क्रूरतेने जगाला मोठा धक्का बसलाय. निष्पापांची क्रूर हत्या हा दहशतीचा भयानक चेहरा जगासमोर आलाय. तेव्हा पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा दिला तर भारत आपला निर्णय बदलू शकतो, असा सूचक इशाराही पंतप्रधान मेदींनी दिलाय. भारताच्या क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला तेव्हा दहशतवादी संघटनांच्या इमारतीच नाही तर त्यांचे मनोबलही डळमळीत झालंय.


?si=iPTv2DHAC1acNE8H

भारताने दहशतवादाविरूद्धच्या लढाईत ऑपरेशन सिंदूरच्या तीन रेषा आखल्या आहेत, पाहूयात पुढीलप्रमाणे


पहिली रेषा


१. दहशतवादी हल्ला झाल्यास योग्य उत्तर देणार
२. भारत आपल्या पद्धतीने प्रतिसाद देणार
३. भारत स्वतःच्या अटींवर उत्तर देणार
४. दहशतवाद्यांची पाळमुळे उपटण्यासाठी कडक कारवाई करणार



दुसरी रेषा


१.भारत न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही
२. दहशतवादी अड्ड्यांवर अचूक आणि निर्णायक हल्ला करेल



तिसरी रेषा


१. दहशतवादाला आश्रय देणाऱ्यांना धडा शिकवणार
२. दहशतवाद्यांच्या पडद्यामागच्या सूत्रधारांना वेगळा घटक म्हणून पाहणार नाही
३. भारत आणि त्याच्या नागरिकांना धोक्यापासून वाचवण्यासाठी निर्णायक पावले उचलणार


पंतप्रधान मोदी एवढ्यावर थांबले नाहीत तर त्यांनी आता पाकिस्तानशी चर्चा होईल ती दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीरबाबतच असा सज्जड दमही दिलाय. इतकं सांगूनही पाकिस्तान ऐकणार नसेल तर भारताला निर्णयक पाऊल उचलावंच लागेल आणि तीच तमाम भारतीयांची भावना असेल.

Comments
Add Comment