
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात दोन वाघांमध्ये जोरदार झुंज झाली. या झुंजीत एक वाघ मृत्युमुखी पडला, तर एक वाघ जखमी झाला.
ताडोबात बफर मधील निमढेला नियत क्षेत्रात दोन वाघांमध्ये जोरदार झुंज झाली. या झुंजीत एक वाघ मृत्युमुखी पडला, तर एक वाघ गंभीर जखमी झाला. काल सर्वत्र मचाण सेन्सस सुरू असताना रात्री आठ वाजताच्या सुमारास ब्रम्ह आणि छोटा मटका यांच्यात जोरदार लढाई झाली. दोन्ही वाघ एकमेकांवर धावून गेले आणि त्यांच्या आवाजाने परिसरात भीती पसरली.
लढाई एवढी जोरदार होती की यात ब्रम्ह या वाघाचा मृत्यू झाला आणि छोटा मटका हा वाघ गंभीर जखमी झाला. सफारी आटोपून परतणाऱ्या पर्यटकांनी स्थानिक वन कर्मचाऱ्यांना ही माहिती दिली. हे दिसताच स्थानिक वन कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना ही माहिती दिली. त्यावेळी तातडीने वरीष्ठ घटनास्थळी पोहचले. आज सकाळी या घटनेचा पंचनामा करण्यात आला.