River : देशात वाहतेय पुरुष नदी ;कसा आहे भारतातील पुरुष नदीचा प्रवास

मुंबई: आपला देश हा नद्यांचा देश. गंगा, यमुना, भद्रा, गोदावरी यांसारख्या असंख्य नद्या वाहत आहेत. मात्र या नद्यांना जी नावं दिली आहेत ती स्त्रीलिंगी आहेत. असं असलं तरी आपल्या देशात एका नदीला पुरुषाचं नाव देण्यात आलंय. पाहूयात कोणती आहे ही नदी ?

नद्यांमुळे देश सुजलाम, सुफलाम होतो. आपला देश नद्यांमुळे सुजलाम सुफलाम झालाय.यातील एका पुरुष नदीचाही मोठा सहभाग आहे. ही पुरुष नदी भारतातून वाहत असली तरी तिचा उगम मात्र तिबेटमध्ये झालाय. या नदीचा प्रवास खूप मोठा आहे.



काय आहेत या पुरुष नदीची वैशिष्ट्यं ती पाहूयात
पुरुष नदीची वैशिष्ट्यं
- भारतात नव्हे तर तिबेटमध्ये उगम
- तिबेट, भारत आणि बांगलादेशातून प्रवास
- भारतातली सर्वात मोठी नदी
- नदीची लांबी 2900 किमी.
- भारतातील नदीची लांबी 916 किमी

या पुरुष नदीचा उगम तिबेटच्या पुरंग जिल्ह्यातल्या मानसरोवर तलावाजवळ झालाय. तिबेटमध्ये या पुरष नदीला त्सांग पो असं म्हटलं जातं तर बांगलादेशात जमुना असं संबोधलं जातं. भारतामध्ये ही पुरुष नदी अरुणाचल प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, मेघालय, नागालँड, सिक्कीम, मणिपूर या प्रदेशांतून वाहते.

आता तुमची उत्सुकता कमालीची वाढलीय. देशातली ही पुरुष नदी कोणती ? केव्हा सांगणार ? तर ऐका. या पुरुष नदीचं नाव आहे ब्रह्मपुत्रा. या ब्रह्मपुत्रा नदीचं वेदांमध्ये पुल्लिंगी असं वर्णन करण्यात आलंय. ब्रह्मपुत्रा अर्थात ब्रह्मदेवाचा पुत्र असा अर्थ होतो. त्यामुळे या नदीचा उल्लेख ब्रह्मपुत्र असाही केला जातो. आहे ना देशातील एकमेव पुरुष नदी जीचं नाव आहे ब्रह्मपुत्रा.

Comments
Add Comment

सौदी अरेबियामध्ये एका वर्षात ३४० लोकांना फाशी देण्यात आली

सौदी अरेबियाने या वर्षी आतापर्यंत ३४० लोकांना मृत्युदंड दिला आहे.ही संख्या गेल्या वर्षीच्या ३३८ च्या विक्रमाला

भर संसदेत महिला खासदार एकमेकींशी भिडल्या...

मेक्सिकोतील संसदेत हाणामारी झाली आहे.याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे

ऑस्ट्रेलिया : सिडनीत हनुक्का उत्सवादरम्यान गोळीबार, १० जणांचा मृत्यू

सिडनी : ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे बोंडी बीचवर (समुद्रकिनारा) ज्यू नागरिक हनुक्का उत्सव साजरा करत असताना दोन

आसाममध्ये माजी हवाई दल अधिकारी कुलेंद्र सरमाला अटक

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश गुवाहाटी : पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांसाठी हेरगिरी

पाकिस्तानच्या इतिहासात आयएसआय प्रमुखाला पहिल्यांदाच शिक्षा

जनरल फैज हमीद यांना १४ वर्षे तुरुंगवास इस्लामाबाद : भारताविरोधात कटकारस्थाने रचणारी पाकिस्तानची गुप्तचर

फ्रान्समध्ये वीज झाली पूर्ण मोफत

युरोप  : फ्रान्स देशात काही विशिष्ट कालावधीसाठी विजेची किंमत अचानक 'शून्य' झाली आहे. मागणीत मोठी घट आणि उत्पादनात