
शिर्डी : शिर्डीच्या साईबाबा संस्थानने भाविकांसाठी नवी ‘डोनेशन पॉलिसी’ जाहीर केली असून, आता केवळ १०,००० देणगी देणाऱ्यालाही थेट आरतीचा मान मिळणार आहे. तिरुपती बालाजीच्या धर्तीवर तयार केलेली ही योजना उच्च देणगीदार भक्तांसाठी विशेष सुविधा देणार आहे.
याआधी २५,००० देणाऱ्यांनाच आरती व विशेष दर्शनाचा लाभ मिळत होता. मात्र आता ही मर्यादा घटवून १०,००० करण्यात आली आहे. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले की, “देणगीदार भाविकांची सेवा ही आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांच्या मागणीनुसार ही योजना आखली गेली आहे.”

शिर्डी : जगभरात प्रसिद्ध असलेल्या शिर्डीतील साईबाबांच्या चरणी अखंड भक्तीभावाने दान करणाऱ्या भक्तांमुळे शिर्डी साईबाबा संस्थान हे देशातील सर्वात ...
नव्या धोरणात काय मिळणार?
१०,००० – ५०,००० देणगी: ५ भाविकांसाठी एक व्हीआयपी आरती
५०,००० – १ लाख: दोन आरत्या व वर्षातून एकदा ५ जणांना मोफत दर्शन
१ लाख – १० लाख: दोन VVIP आरत्या व वर्षातून एकदा लाईफटाईम दर्शन
१० लाख – १५ लाख: दोन VVIP आरत्या, ५ जणांना वर्षातून एकदा लाईफटाईम VIP दर्शन
५० लाखांहून अधिक देणगी: तीन VVIP आरत्या व वर्षातून दोनदा लाईफटाईम VIP दर्शन
यासोबतच, पंढरपूरच्या धर्तीवर एक नवी अट लागू करण्यात आली आहे. सामान्य दर्शन रांगेत सुरुवातीस येणाऱ्या दोन भाविकांनाही आरतीसाठी प्रवेश दिला जाणार आहे.
या नव्या धोरणामुळे साई भक्तांना सेवा-सुविधा अधिक सुलभ होणार असून, संस्थानला आर्थिकदृष्ट्या बळकटी मिळणार असल्याचं मानलं जात आहे.