
शिर्डी : जगभरात प्रसिद्ध असलेल्या शिर्डीतील साईबाबांच्या चरणी अखंड भक्तीभावाने दान करणाऱ्या भक्तांमुळे शिर्डी साईबाबा संस्थान हे देशातील सर्वात संपन्न धार्मिक संस्थांपैकी एक मानलं जातं. याच संस्थेकडे सध्या ५१४ किलो सोनं असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
त्यांनी सांगितलं की, या ५१४ किलो सोन्यापैकी निम्मं सोनं रोजच्या पूजाविधी, सिंहासन, मुकुट, हार यांसाठी वापरलं जातं. उर्वरित सोनं मंदिर परिसरातील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षितरीत्या ठेवण्यात आलं आहे.
सोन्याची नाणी करण्याचा प्रस्ताव न्यायप्रविष्ट
२०२१ मध्ये १५५ किलो सोनं वितळवून १, २ व ५ ग्रॅमची नाणी तयार करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला परवानगी मिळाल्यानंतर २०२३ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली, मात्र अद्याप निर्णय झालेला नाही. गाडीलकर यांनी स्पष्ट केलं की, हा विषय सध्या न्यायप्रविष्ट आहे.

शिर्डी : शिर्डीच्या साईबाबा संस्थानने भाविकांसाठी नवी ‘डोनेशन पॉलिसी’ जाहीर केली असून, आता केवळ १०,००० देणगी देणाऱ्यालाही थेट आरतीचा मान मिळणार आहे. ...
भक्तांकडून दानाचा ओघ सुरुच
साई संस्थान दरवर्षी कोट्यवधींचं दान स्वीकारतं. यामध्ये रोकड, मौल्यवान दागदागिने यांचा समावेश असतो.
विशेष म्हणजे, नुकतंच दुबईहून आलेल्या एका भाविकाने २७० ग्रॅम सोन्याचं 'ॐ साई राम' नाव मंदिरात अर्पण केले आहे.
शिर्डी साई संस्थानचं हे सोने मंदिरासाठी केवळ संपत्ती नव्हे, तर भाविकांच्या श्रद्धेचं आणि समर्पणाचं प्रतीक आहे.