
मुंबई : स्मार्टफोन निर्मितीत आघाडीवर असलेल्या सॅमसंग कंपनीकडून गॅलेक्सी S25 एज हा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच होत आहे. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC) 2025 मध्ये प्रथमच झलक दाखवण्यात आलेल्या या डिव्हाइसला कंपनीने “बियॉन्ड स्लिम” असं वर्णन दिलं असून, त्यात केवळ स्लिम डिझाइनच नव्हे तर अत्याधुनिक AI-आधारित तंत्रज्ञानाची भर असणार आहे.
सॅमसंग गॅलेक्सी हा मोबाईल AI आणि कॅमेरासाठी ओळखला जातो त्यामुळे गॅलेक्सी S25 एजमध्ये 200 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असून, त्यासोबत Galaxy AI फिचर्स असणार आहेत. ही सेन्सर प्रणाली Galaxy S25 Ultra सारखीच असण्याची शक्यता आहे. याशिवाय, 12MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 12MP फ्रंट कॅमेरा सेल्फीसाठी दिला जाणार आहे. नवीन AI फिचरमुळे फ्रेममधील प्रमुख घटक ओळखून आठवणींचे आकर्षक व्हिडिओ तयार करता येतील.
या मोबाईलची डिझाइन आणि डिस्प्ले मुख्य आकर्षण असणार आहे. केवळ 5.85 मिमी फ्लॅट फ्रेम हा सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्लीम गॅलेक्सी S-सिरीज फोन ठरणार आहे. 6.7 इंचांचा AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, आणि Gorilla Glass Ceramic 2 प्रोटेक्शन यामुळे स्क्रीन अत्यंत आकर्षक आणि टिकाऊ असणार आहे. फोनचं वजन सुमारे 163 ग्रॅम आहे.
हा मोबाईल आकाराने स्लीम जरी असला तरी परफॉर्मन्समध्ये कोणतीही कमतरता नाही त्यासाठी Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसरसह 12GB RAM आणि 512GB पर्यंत स्टोरेज देण्यात आलं आहे. फोनमध्ये 3,900mAh क्षमतेची बॅटरी असून, AI आणि स्लीम डिझाइन यामुळे बॅलन्स साधण्याचा प्रयत्न केला आहे.
हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित One UI 7 वर चालेल. याला IP68 प्रमाणपत्र आहे, म्हणजेच तो पाण्यापासून आणि धुळीपासून सुरक्षित राहील. हा फोन टायटॅनियम सिल्वर, टायटॅनियम आइसिब्लू, आणि टायटॅनियम जेट ब्लॅक तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे
सॅमसंगने या फोनला “AI शक्ती आणि अभियांत्रिकीचा अद्वितीय संगम” असल्याचं म्हटलं आहे. गॅलेक्सी S25 एज हे फ्लॅगशिप परफॉर्मन्स आणि पोर्टेबिलिटी यांचं उत्तम उदाहरण ठरणार आहे.