Tuesday, May 13, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

निवडणुकांची तयारी, भाजपने भाकरी फिरवली; राज्यात ५८ जिल्हाध्यक्षांची नवी यादी जाहीर

निवडणुकांची तयारी, भाजपने भाकरी फिरवली; राज्यात ५८ जिल्हाध्यक्षांची नवी यादी जाहीर

मुंबई : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने पक्ष संघटनेत महत्त्वाचे बदल केले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकांनंतर भाजपने वरिष्ठ नेते रविंद्र चव्हाण यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याऐवजी पक्षीय स्तरावर मोठी जबाबदारी दिली. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपने संघटन पर्व अभियान राबवले. त्या माध्यमातून भाजपने तब्बल दीड कोटी सदस्य नोंदणी पूर्ण केली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ही रणनीती आखण्यात येत आहे.


त्यातच, आता भाजपने राज्यातील सर्वच जिल्ह्यांसाठी भाजपच्या ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये, मुंबई जिल्हाध्यक्षपदासाठी तीन पदे तयारी करण्यात आली आहे. उत्तर मुंबई, उत्तर पूर्व मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईसाठी जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये, अनुक्रमे दीपक तावडे, दीपक दळवी आणि विरेंद्र म्हात्रे यांना जबाबदारी देण्यात आली आहे.



महाराष्ट्र भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल करण्यात आले असून अखेर भाजपकडून नव्या जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. राज्यातील मंडळ आणि तालुका अध्यक्षांच्या नेमणुकीनंतर भाजपकडून जिलाध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपचे प्रदेश निवडणूक निर्णय अधिकारी चैनसुख संचेती यांच्या सहीने भाजपकडून परिपत्रक जारी करत नव्या जिल्हाध्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने कोकण, पश्चिम महराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि मुंबईत अशा प्रदेशात राज्यातील ३६ जिल्ह्यात एकूण ५८ जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर करण्यात आली आहे.

Comments
Add Comment