Friday, October 24, 2025
Happy Diwali

मान्सून अंदमानमध्ये दाखल, आगामी ५ जूनला महाराष्ट्रात हजेरी लावणार

मान्सून अंदमानमध्ये दाखल, आगामी ५ जूनला महाराष्ट्रात हजेरी लावणार

मुंबई: मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला असून आगामी २७ मे रोजी केरळमध्ये दाखल होईल. त्यानंतर पाच जून रोजी मान्सून कोकणामार्गे महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता आहे. तर १५ जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मान्सूनची वाटचाल यंदा वेगाने सुरू आहे.मान्सून सरासरी वेळेच्या ५ दिवस आधीच अंदमानात दाखल झाला आहे. मान्सूनने दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग, दक्षिण अंदमान समुद्राचा काही भाग, निकोबार बेट आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागापर्यंत वाटचाल केली आहे.

पुढील ३ ते ४ दिवसांत मान्सून आणखी काही भागात प्रगती करेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.पुढील तीन ते चार दिवसात दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्र; दक्षिण बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भाग मान्सून दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती देखील भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा