
मुंबई: मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा मुंबईत दहशत माजवण्याची धमकी देणारा ईमेल मिळाला आहे. पुढच्या दोन दिवसांत बॉम्बस्फ़ोट होईल असा धमकीचा ई-मेल महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाला आहे. या ई-मेल नंतर मुंबईसह अनेक शहरांमध्ये पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र प्रशासनाने या धमकीला गांभीर्याने घेण्याचा इशारा दिला आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला एक धमकीचा ईमेल आला आहे. या मेलमध्ये, पुढील दोन दिवसांत एक मोठा बॉम्बस्फोट होणार असल्याचे म्हंटले आहे. नियंत्रण कक्षाने हा मेल मुंबई पोलिसांना पाठवला आहे.
ईमेल नंतर मुंबई पोलीस यंत्रणा सतर्क
मुंबई पोलीस प्रशासनाने या ईमेलला गांभीर्याने घेण्याचा इशारा दिला आहे. सध्या पोलीस सदर ईमेल आयडी ट्रॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत. ईमेल पाठवणाऱ्याचे स्थान देखील अद्याप ट्रॅक झालेले नाही. मात्र, यानंतर मुंबई पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसोबतच, ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीचाही शोध घेतला जात आहे.